Beating esakal
नाशिक

Nashik Crime News : शहरात मारहाणीच्या घटना थांबेनात! पोलीस गस्त नसल्याचा परिणाम

Crime News : शहर आयुक्तालय हद्दीमध्ये कुरापत काढून तर कधी जुन्या भांडणांच्या कारणातून शहरात ठिकठिकाणी मारहाणीच्या घटना घडत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहर आयुक्तालय हद्दीमध्ये कुरापत काढून तर कधी जुन्या भांडणांच्या कारणातून शहरात ठिकठिकाणी मारहाणीच्या घटना घडत आहेत. पोलीस ठाणेनिहाय पोलीस गस्त नसल्याने टवाळखोरांच्या बाचाबाची वाढल्याने मारहाणीच्या घटनांत वाढ झाली आहे. (Nashik Crime incidents of quarrel dispute beatings not stop in city result of no police patrols marathi news)

पंचवटीतील मोरे मळ्यात दारुसाठी पैसे न दिल्याच्या कारणातून दोघा संशयितांनी एकाला मारहाण केली. कार्तिक संभारे, प्रकाश दोबाडे असे संशयितांची नावे आहेत. केतन बाळासाहेब रणमाळे (रा. रामनगर, मोरे मळा, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता. ६) रात्री साडेदहाच्या सुमारास सदरचा प्रकार घडला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंदवल्ली येथे वाहनाचा हॉर्न वाजवून बाजुला होण्यास सांगितल्याचा राग धरून चौघा संशयितांनी एकाला बेदम मारहाण केली. अरबाज शेख, राहील नुरुद्दीन शेख (२१, रा. दत्त चौक, शिवाजीनगर), संघर्ष, चिवा (सर्व रा. धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर) अशी संशयितांची नावे आहेत.

संजय देवराम माळी ( रा. धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता. ७) पावणेनऊच्या सुमारास संशयितांनी शिवीगाळ करीत हेल्मेटने मारून दुखापत केली. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यता आला आहे.  (latest marathi news)

देवळाली गाव येथे गांधी धाम येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून एकाला शिवीगाळ व मारहाण करीत लोखंडी पाईपाने मारून दुखापत केली. हेमू उर्फ विजय मेहेरोलिया, अक्षय मेहेरोलिया (रा. गांधीधाम, देवळाली गाव) असे संशयितांची नावे आहेत. सोहेब फिरोज पठाण ( रा. शिंगवे बहुला, देवळाली कॅम्प) यांच्या फिर्यादीनुसार, रविवारी (ता. ७) दुपारी दीडच्या सुमारास सदरची घटना घडली.

उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचकमधील बोराडे मळ्यात पिंपळपट्टी येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून एकाला मारहाण केल्याची घटना घडली. प्रथमेश संतोष मोरे, गौरव बबन शिंगणे (रा. पिंपळपट्टी, बोराडे मळा, पंचक) असे संशयितांची नावे आहेत.

निखिल संजय बोराडे (रा. पिंपळपट्टी, बोराडे मळा, पंचक) याच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता. ६) रात्री अकरा वाजता संशयितांनी शिवीगाळ करून लोखंडी वस्तूने मारून दुखापत केली. तसेच दुचाकीचेही नुकसान केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Medal Tally in CWG 2026: 'Gen Z' ची हवा! ज्युदोत ३ ऐतिहासिक पदकं अन् नीरजचे रौप्य... तालिकेत भारत कितव्या क्रमांकावर?

PM Narendra Modi: "माझ्या आईचाही अपमान झाला... पण मी तुम्हाला माफ करतो"; जंतर मंतर प्रकरणावर PM मोदींचा भावनिक इन्स्टा व्हिडिओ

Commonwealth Games 2026: १० पैकी १०! भारताच्या बॉक्सर्सनी इतिहास-भूगोल बदलला; १० 'सुवर्ण' पदकांवर दावा ठोकला... आज फैसला

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

३३ लाख वारकऱ्यांच्या गर्दीत एकही चोरी नाही! पोलिस अधीक्षक म्हणाले, आषाढी वारीइतकी गर्दी कधीच बघितली नाही, ‘सीएम साहेबांच्या दौऱ्याचेही खूप टेन्शन होते’, पण...

SCROLL FOR NEXT