crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : तडीपार संशयितांचा शहरात वाढता वावर! शहरासह जिल्हा पोलिसांसमोर आव्हान

Crime News : शहरातील गुन्हेगारीवर अंकुश बसावा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, सर्वत्र शांतता नांदो, यासाठी समाज विघटक संशयिताना शहर जिल्ह्यातून तडीपार करण्याची कारवाई पोलिस विभागाकडून केली जाते.

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : तडीपार संशयितांचा शहरात दिवसेंदिवस वावर वाढत आहे. विविध प्रकारच्या गंभीर गुन्ह्यात तडीपार संशयित सहभागी असल्याचे गेल्या काही दिवसांत घडलेल्या गुन्ह्यात निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर कुठली ठोस कारवाई होत नसल्याने त्यांच्याकडून पोलिसांना आव्हान देण्याचे काम केले जात आहे. (Increasing activity of suspects in city)

शहरातील गुन्हेगारीवर अंकुश बसावा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, सर्वत्र शांतता नांदो, यासाठी समाज विघटक संशयिताना शहर जिल्ह्यातून तडीपार करण्याची कारवाई पोलिस विभागाकडून केली जाते. मात्र संशयित त्यांच्यावर झालेल्या कारवाईस आव्हान देत तडीपारीचे उल्लंघन करून शहरात वावरत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

काही गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले आहे. गंजमाळ पंचशील नगर येथे घरात घुसून तडीपार संशयिताचा खून झाला होता. चोरीच्या वाटाघाटीच्या पैशातून त्याचा खून झाल्याची परिसरात चर्चा होती. तसेच काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरीत तडीपार संशयित आढळला होता.

इतकेच नाही तर दोन दिवसांपूर्वी जुने नाशिक येथून ताब्यात घेतलेला मोबाईल चोर तडीपार असल्याचेही निष्पन्न झाले. मारहाणीच्या विविध घटनांत तडीपार संशयित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तडीपार असताना त्यांचा शहरातील वावर, असे प्रकार गुन्हेगारी घटनांना वाव देत आहे. (latest marathi news)

त्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांना शहर-जिल्ह्यात बंदी असताना ते अवैधरीत्या शहरात वावरतात. पोलिसांना आढळून आल्यास त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले जाते. न्यायालयातून त्यांची जामीनावर सुटका होते. त्यामुळे विशेष अशी कारवाई होत नसल्याने त्यांचे धाडस वाढत असल्याचे बोलले जात आहे.

नजर कैदची अपेक्षा

तत्कालीन पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी तडीपारांवर नजर कैदची कारवाई केली होती. पोलिसांना तडीपार संशयित आढळल्यास त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात होत होती. शहर-जिल्ह्यातून बाहेर असताना निदान संशयिताना बाहेर वावरता येत होते. परंतु त्यांनी राबवलेल्या कायदेशीर मोहिमेत तडीपार संशयितांना मध्यवर्ती कारागृहात नजरकैदेत राहावे लागत होते.

त्यांचा वावर त्यावेळेस कमी झाला होता. त्यांची बदली होताच पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली आहे. त्यांनी केलेल्या कारवाईचे अवलंब करत पोलिसांनी संशयीतांना नजर कैद करण्याची कारवाई केल्यास संशयितांवर वचक बसेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Women World Cup : भारतीय महिला संघ सेमिफायनलमध्ये तर पोहोचला, पण सामना नेमका कधी अन् कुणाशी होणार? जाणून घ्या समीकरण...

एकदम क्यूट! शशांक केतकराच्या लेकीला पाहिलत? दिवाळीनिमित्त शेअर केला खास फॅमिली फोटो

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १७व्या रोजगार मेळाव्यात ५१,०००हून अधिक युवकांना नियुक्तीपत्रे दिली

Piyush Pandey Death : 'अबकी बार, मोदी सरकार' या घोषवाक्याचे जनक पियुष पांडे यांचे निधन; कॅडबरी, फेविकॉल, एशियन पेंट्ससारख्या जाहिरातींना दिलं नवं रूप!

Jayant Patil : जयंत पाटलांच्या साखर कारखान्याचे नाव रात्रीतून बदललं, गोपीचंद पडळकरांच्या मतदार संघातील साखर कारखाना कमानीवर वेगळचं नाव...

SCROLL FOR NEXT