Suspect arrested along with Gavathi Kattaya. A team from Unit Two of the City Crime Branch along with esakal
नाशिक

Nashik Crime News : इंदिरानगर परिसरामध्ये गावठी कट्ट्यासह एकाला अटक

Crime News : शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे अंमलदार मनोहर शिंदे, महेश खांडबहाले यांना संशयित इंदिरानगर परिसरात गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली होती

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : इंदिरानगर परिसरामध्ये गावठी कट्टा विक्री करण्यासाठी आलेल्या संशयिताला शहर गुन्हेशाखेच्या युनिट दाेनच्या पथकाने अटक केली. किरण बाळासाहेब दिवे (२८, रा. देवपूर, ता. सिन्नर. सध्या रा. इंदिरानगर) असे संशयिताचे नाव आहे.

शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे अंमलदार मनोहर शिंदे, महेश खांडबहाले यांना संशयित इंदिरानगर परिसरात गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली होती. (Nashik Crime One arrested with Gavathi Katta)

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांना माहिती दिली असता, लेखानगर-राणेनगर सर्व्हिसरोडवर गुरुवारी (ता. २१) सापळा रचण्यात आला. या रस्त्यावरी सुमन पेट्रोल पंपाजवळ संशयित आला असता, दबा धरून असलेल्या पथकाने त्यास अटक केली.

अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ३० हजार ५०० रुपयांचा गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी अंमलदार मनोहर शिंदे, महेश खांडबहाले, विशाल कुंवर, समाधान वाजे, तेजस मते, स्वप्निल जुंद्रे, चंद्रकांत गवळी, सोमनाथ जाधव, प्रकाश महाजन, सुनील आहेर यांनी बजावली. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT