Crime Investigation Team while rescuing cattle. esakal
नाशिक

Nashik Crime News : गुन्हे शोध पथकाकडून गोमांससह गोवंश जप्त

Nashik Crime : भद्रकाली गुन्हे शोध पथकाने केलेल्या कारवाईत १५० किलो गोमांस आणि तीन गोवंश असा सुमारे ७५ हजारांचा ऐवज जप्त केला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : भद्रकाली गुन्हे शोध पथकाने केलेल्या कारवाईत १५० किलो गोमांस आणि तीन गोवंश असा सुमारे ७५ हजारांचा ऐवज जप्त केला. भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी (ता. २५) सकाळच्या सुमारास छापा टाकून कारवाई करण्यात आली. (Nashik Crime investigation team seized beef along with beef marathi news)

कुरेशी गल्ली येथे कत्तलीच्या इराद्याने गोवंश जनावरे बांधून ठेवण्याची माहिती कय्यूम सय्यद यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार, पोलिस उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे, सतीश साळुंखे, कय्यूम सय्यद, नीलेश विखे, अविनाश जुंद्रे, नितीन भामरे, दयानंद सोनवणे यांनी त्याठिकाणी छापा टाकला.

विक्रीसाठी असलेले गोमांस आढळून आले. मोकळ्या जागेत तीन गोवंश बांधलेली आढळून आली. पोलिसांनी कारवाई करत जनावरांची सुटका केली. १५० किलो गोमांससह रिक्षा जप्त केली. इरफान इस्माईल शेख (वय २७, रा. भोई गल्ली), रफिक जाफर कुरेशी(वय ५५, रा. वडाळा नाका) अशा दोघांना ताब्यात घेतले आहे. भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : 'ऑपरेशन सिंदूर' वेळी कॉंग्रेस पाकिस्तानच्या लष्कराच्या पाठिशी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

१६ वर्षांच्या भावाला आणून द्या आणि सामना खेळवा; पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचा भारत-पाकिस्तान मॅचला विरोध

Pune Traffic Update : पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शास्त्रीनगर चौकात उपाययोजना; वाहतूक कोंडीवर तोडगा

Video : शुभांशु शुक्लांनी सांगितलं, अंतराळात व्यायाम कसा करतात? तशीच आसने पृथ्वीवर केल्यास शरीराला कोणते फायदे होतात, जाणून घ्या

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

SCROLL FOR NEXT