CRIME NEWS esakal
नाशिक

Nashik Crime News : बसस्थानक की चोरट्यांचा अड्डा! ठक्कर बाजार बसस्थानकात दागिने चोरणाऱ्या टोळ्या कार्यरत

Latest Crime News : या ठिकाणी नेहमीच असे प्रकार घडून असून बसस्थानकाच्या आवारातच चोरट्यांच्या टोळ्या कार्यरत असून, खुलेआम चोऱ्या होत असताना पोलीस मात्र सोयीस्कर दूर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : पुणे येथून नाशिकला आलेल्या महिलेच्या गळ्यातील लाखाची मंगळसूत्र तर, एका व्यक्तीचे २२ हजारांची सोन्याची चैन ठक्कर बाजार बसस्थानकात अज्ञात चोरट्याने हातोहात लंपास केल्याचा प्रकार घडला. यामुळे बसस्थानक आहे की चोरट्यांचा अड्डा असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

या ठिकाणी नेहमीच असे प्रकार घडून असून बसस्थानकाच्या आवारातच चोरट्यांच्या टोळ्या कार्यरत असून, खुलेआम चोऱ्या होत असताना पोलीस मात्र सोयीस्कर दूर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. (Jewelery stealing gangs operating in Thakkar Bazar Bus Stand)

रुपाली सचिन वैद्य (रा. मोखाडा, जि. पालघर) यांच्या फिर्यादीनुसार, त्या शनिवारी (ता. २८) दुपारी बाराला पुण्यातून नाशिककडे येण्यासाठी बसने निघाल्या. सायंकाळी सातला ठक्कर बाजार बसस्थानकात बस आली असता, गर्दीमध्ये त्यांच्या गळ्यातील १ लाख ७ हजार ८१८ रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेले.

तर, दुसरी घटनाही त्याच दिवशी दुपारी एकच्या सुमारास घडली. पंकज अभिमन्यु बागुल (रा. श्रीरामनगर, कोणार्कनगर, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता. २८) दुपारी एक वाजता ते आई-वडील, व बहिणीला ताहाराबाद येथे जायचे असल्याने ठक्कर बाजार बसस्थानकात घेऊन आले होते. (latest marathi news)

नवापूर-साक्री बसमध्ये (एमएच २० बीएल १३९१) चढण्यासाठी गर्दी होती. त्यामुळे बागुल हे बसमधील सीटसाठी आतमध्ये गर्दीतून चढले. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २२ हजार ५०० रुपयांची सोन्याची चैन खेचून चोरून नेली. याप्रकरणी दोन्ही गुन्हे सरकारवाडा पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

चोरट्यांचा खुलेआम वावर

शहरातील जुने बसस्थानक (सीबीएस), ठक्कर बाजार आणि महामार्ग बसस्थानक या तीनही ठिकाणी चोरट्यांना खुलेआम वावर आहे. या ठिकाणी नेहमीच गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवासी महिला, ज्येष्ठ महिला, नागरिक, लहान मुले यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, बॅगेतील पर्स असा हातचलाखीने चोरून लंपास करतात. विशेषत: महिला चोरट्यांचा वावर याठिकाणी असून, पोलिसांत दाखल गुन्ह्यांमध्ये अद्यापपर्यंत एकही गुन्हा उघडकीस आलेला नाही. त्यामुळे पोलीस व या चोरट्यांचा हितसंबंध आहे की काय, अशीच चर्चा पीडित तक्रारदारांमध्ये असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT