Bus stand at Kalwan. In the second photo, a closed police station. esakal
नाशिक

Nashik Crime: कळवण बसस्थानक बनले सोनसाखळी चोरांचा अड्डा! कायमस्वरुपी पोलिस कर्मचारी नेमणुकीची मागणी

Crime News : शहरातील बसस्थानक परिसरात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून, चोरट्यांनी ज्येष्ठ महिला, शालेय व महाविद्यालयीन मुलींना लक्ष्य केले आहे

सकाळ वृत्तसेवा

कळवण : शहरातील बसस्थानक परिसरात सोनसाखळी चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून, चोरट्यांनी ज्येष्ठ महिला, शालेय व महाविद्यालयीन मुलींना लक्ष्य केले आहे. दिवसांआड सोनसाखळ्या चोरीचे प्रमाण वाढले असून, बसस्थानक जणू सोनसाखळी चोरांचा अड्डाच बनले आहे. चोरट्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवासांनी केली आहे. (Nashik Crime Kalavan bus station gold chain thieves marathi news)

कळवण आदिवासीबहुल तालुका आहे. बहुतांशी नागरीक बसने प्रवास करतात. बसमध्ये प्रवासी चढ-उतार करीत असताना गर्दी होते. या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे ज्येष्ठ महिला व महाविद्यालयीन मुलींच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारतात.

घटनेनंतर संपूर्ण बसची तपासणी करुनही पोलिसांना चोरटे सापडत नाही. पोलिस ठाण्यात तक्रार करुनही उपयोग होत नाही. परिणामी, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. शहरातही बंद घरांना लक्ष्य केले जात असून, भरदिवसा धाडसी चोऱ्या झाल्या आहेत. (Latest Marathi News)

लोकप्रतिनिधींच्या निवेदनाला केराची टोपली

मेनरोडवरील वाहतूक कोंडी व बस स्थानकातील चोऱ्यांबाबत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शैलेश पवार यांच्यासह विविध राजकीय पक्ष, संघटना व पदाधिकाऱ्यांनी कळवण पोलिसांना कायमस्वरुपी पोलिस कर्मचारी नेमणूक करण्याचे निवेदन दिले आहे. असे असताना दिवसभरात एकदोन तासच पोलिस आढळून येतात. बऱ्‍याचदा पोलिस बसस्थानकात येतात. होमगार्डसोबत सेल्फी घेऊन वरिष्ठांना पाठवतात. यापलिकडे काही होत नाही.

पोलिस चौकी नावालाच

बसस्थानक परिसराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तात्पुरत्या स्वरूपात पोलिस चौकी आहे. मात्र, या चौकीत पोलिस कर्मचारीच राहत नसल्याने सदर चौकी शोभेचे बाहुले बनली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT