Vandalism of Kalika Misalpav Center by four suspects. esakal
नाशिक

Nashik Crime News : कालिका मिसळपाव सेंटरची तोडफोड! राडा घालणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल

Nashik News : जुना आग्रा महामार्गावरील हॉटेल संदीपसमोर असलेल्या कालिका मिसळपाव सेंटरची चौघांनी तोडफोड केल्याची घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जुना आग्रा महामार्गावरील हॉटेल संदीपसमोर असलेल्या कालिका मिसळपाव सेंटरची चौघांनी तोडफोड केल्याची घटना घडली. यावेळी संशयितांनी गल्ल्यातील चार हजारांची रोकडही लंपास केली असून, याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kalika Misalpav Center vandalized)

संजय गणपत साळगे (रा. कालिका मंदिरामागे, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे मुंबई नाका येथील हॉटेल संदीपसमोर कालिका मिसळपाव सेंटर आहे. सोमवारी (ता.१०) रात्री ते दुकान बंद करून घरी गेले होते. रात्री पावणे बाराच्या सुमारास त्यांना फोन आला की, त्यांच्या मिसळपाव दुकानाची तोडफोड करण्यात आली आहे.

त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, संशयित किरण सुभाष भामरे, ओम लोंढे, विक्रांत सोनवणे, रोहीत माने यांनी त्यांच्या मिसळपाव दुकानाची, टेबल-खुर्च्यांचीच तोडफोड केली. (latest marathi news)

तसेच, दुकानाच्या गल्ल्यातील चार हजार रुपये, दोन गॅस सिलेंडर चोरून नेले. यात त्यांचे सुमारे ९ हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार टेमगर हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता CJP ची नवी लढाई; अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा, नेमका काय प्लॅन? सरकारचं टेन्शन वाढणार?

भारतीय संघाच्या फिटनेसवर BCCI चा 'सर्जिकल स्ट्राईक'! सीनियर-ज्युनियर पाहू नका, सर्वांना एकच नियम... वाचा BCCI Fitness Standards

राजपाल यादवने बँकेकडून सुद्धा घेतलेलं १६ कोटींचं कर्ज, ते पण फेडलं नाही? आता घराचा होणार लिलाव

Marathi News Live Updates : जनता वसाहतीत सराईत गुन्हेगारांसह तिघे अल्पवयीन ताब्यात; 12 धारदार शस्त्रे जप्त

SIR Voter List : 'अब्सेंट', 'शिफ्टेड' की 'डुप्लिकेट'? मतदार यादीतील नावांबाबत नवा मेसेज आलाय? घाबरू नका, ही आहे प्रक्रिया

SCROLL FOR NEXT