Tata Tempo and Khair wood seized by forest officials. esakal
नाशिक

Nashik Crime News : वन विभागाच्या कारवाईत खैर जप्त; 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, गुन्हा दाखल

Nashik Crime : झरी वनपरिक्षेत्रातील वनाधिकारी गस्त करून वनसंरक्षणाची कामे करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे खैरची अवैध वाहतूक करताना खैर लाकूड जप्त करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : पेठ तालुक्यात फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्प. ऑफ महाराष्ट्रच्या राखीव वनक्षेत्रात आंबा, झरी वनपरिक्षेत्रातील वनाधिकारी गस्त करून वनसंरक्षणाची कामे करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे खैरची अवैध वाहतूक करताना खैर लाकूड जप्त करण्यात आले. संबंधित कारवाईमध्ये मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संशयितांचा शोध सुरू आहे. आंबा झरी वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ८१ आंबा बिटामधून काही जण अवैधरीत्या खैर झाडांची तोड करून वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. ( Khair seized in forest department action )

वनाधिकाऱ्यांनी शेपूझरी पार नदीत सापळा रचून अवैधरीत्या खैर झाडाची तोड करून घेऊन जात असताना टेम्पोचा पाठलाग केला. परंतु अंधाराचा फायदा घेत संशयित आरोपी नवसू लोहार (रा. चिखलीची खोरी, टोकरपाडा, ता. कपराडा, जि. बलसाड) व इतर दोन व्यक्ती पसार झाले. टाटा टेम्पो (डीजे १५, एक्स ४८३१) व खैर नग दहा (अंदाजे चार लाखांचा मुद्देमाल) जप्त करण्यात आले आहे. भारतीय वन अधिनियम व पोटकलमनुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

संबंधित कारवाईत नाशिक वन प्रकल्प विभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी ए. आर. अजेस्त्र, बी. डी. शेवाळे, वनपाल सी. जे. चौरे, वनरक्षक नवीद सय्यद, कुंदन राठोड, डी. यू. शिंगटे, एम. व्ही. विसपुते, एम. जी. वाघ, सी. एम. पवार, प्रादेशिक वनविभाग वनरक्षक तुषार भोये, वसंत गावित, हेमराज गावित, तुळशीराम खांडवी, भास्कर पवार व पुढील गुन्हे कामाचे तपास नाशिक वन प्रकल्प विभागाचे विभागीय अधिकारी डॉ. एस. एन. नेवसे व सहाय्यक व्यवस्थापक डी. पी. परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Visarjan: ...पुढच्या वर्षी लवकर या! मुंबईत १२ वाजेपर्यंत ४०० हून अधिक श्रींचे विसर्जन

ड्रग्ज प्रकरणी सर्वात मोठी कारवाई, १२ हजार कोटींचा माल जप्त; २०० ग्रॅमचा तपास करताना ३२ हजार लीटरपर्यंत पोहोचले पोलीस

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुणे- तांबडी गणपतीचे विसर्जन

Team India: ऋतुराज गायकवाडवर पुन्हा 'अन्याय'! १८४ धावांची खेळी करूनही भारताच्या संघात मिळाले नाही स्थान

India Tallest Ganesha Idol Immersion: भारतातील सर्वात उंच गणपती मूर्तीचे विसर्जन, भक्ती, उत्साह आणि भावनिक निरोपाचा क्षण, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT