Suspects along with minor girl arrested from Ahmedabad. A team of the Prevention of Unethical Human Trafficking Cell. esakal
नाशिक

Nashik Crime News : अपहृत अल्पवयीन मुलगी अहमदाबादेतून ताब्यात; अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची कामगिरी

Crime News : गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर परिसरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेण्यात आले होते

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर परिसरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, गंगापूर पोलीस आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने कसून तपास करीत संशयित मुलासह अल्पवयीन मुली अहमदाबाद येथून ताब्यात घेतले. (Nashik Crime Kidnapped minor girl in custody from Ahmedabad marathi news)(latest marathi news)

अपहृत मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या १७ वर्षीय मुलीचे १३ तारखेला संशयित मुलाने फुस लावून पळवून नेले होते. या गुन्ह्याचा समांतर तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने सुरू केला. पथकाने अपहृत मुलगी व संशयिताचे मोबाईलचे सातत्याने तांत्रिक विश्लेषण करून ते अहमदाबाद (गुजरात) येथे असल्याबाबत निष्पन्न झाले होते.

पथकाने अहमदाबाद गाठून अपहृत मुलीचा सलग दोन दिवस मानवी कौशल्याचा वापर करून शोध घेतला असता अपहृत मुलगी व संशयिताला (रा. बिहार) सानंद जीआयडीसी, अहमदाबाद येथून ताब्यात घेतले आणि नाशिकला आणले. पुढील तपासासाठी गंगापूर पोलिसांच्या ताब्यात दोघांना देण्यात आले आहे. (latest marathi news)

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, पोलीस निरीक्षक सुभाष पवार, उपनिरीक्षक वैशाली भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गणेश वाघ, समीर चंद्रमोरे, वैशाली घरटे यांनी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT