Jailed esakal
नाशिक

Nashik Crime : अंबड एमआयडीसीतील खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप

Latest Crime News : अंबड औद्योगिक वसाहतीत युवकाच्या खून खटल्यामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाने मुख्य आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीत युवकाच्या खून खटल्यामध्ये जिल्हा व सत्र न्यायालयाने मुख्य आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तर, या खटल्यातील दोघा आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. जुलै २०१८ मध्ये खूनाची घटना घडली होती. किरण उर्फ स्वप्निल लक्ष्मण वाघ (२२, रा. कोळीवाडा, विल्होळी, ता. नाशिक) असे जन्मठेपेची शिक्षा ठोठावलेल्या आरोपीची नावे आहेत. (Life imprisonment for accused in Ambad MIDC murder case)

योगेश माळी यांच्या फिर्यादीनुसार, १ जुलै २०१८ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिसिगन ॲटो कंपनीकडे जात होते. त्यावेळी पार्किंगमध्ये आरोपी किरण वाघ व त्याचे साथीदार राकेश वाघ, हिरामण थोरात यांनी मागील भांडणाची कुरापत काढून त्यांना मारहाण सुरू केली. त्यावेळी माळी कंपनीमध्ये पळाले असता, त्यांचा चुलत भाऊ दिनेश जाधव हे बाहेर आले. त्यावेळी आरोपी किरण व दिनेश यांच्यात झटापट झाली असता धारदार हत्याराने वार करीत दिनेश यांना गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाल्याने तिघांविरोधात खूनाचा गुन्हा अंबड पोलिसात दाखल होता.

गुन्ह्याचा तपास तत्कालिन उपनिरीक्षक एम.डी. म्हात्रे यांनी तपास करीत जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा न्यायालयाचे प्रधान न्यायधीश एस.डी. जगमलानी यांच्यासमोर खटला सुरू होता. यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता शिरीष कडवे यांनी कामकाज पाहताना १२ साक्षीदार तपासले. सबळ पुराव्यानिशी आरोपी किरण वाघ याच्याविरोधात आरोप सिद्ध झाल्याने न्यायधीशांनी त्यास जन्मठेपेची शिक्षा व ८ हजारांचा दंड ठोठावला. तर, सबळ पुराव्याअभावी दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार संजय शिंदे यांनी पाठपुरावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

CM Birthday : दिव्यांग मुलांसोबत मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस; केक कापताना मुलांचे प्रेम पाहून झाले भावुक

Cow Milk Rates Rise To ₹43 Per Litre :दूध उत्पादन घटले; संस्थांत ‘पळवापळवी’ वाढली सणासुदीच्या मागणीसह दुष्काळी स्थितीचा परिणाम; गायीचे दूध ४३ रुपये

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

SCROLL FOR NEXT