Mahendra Saraki esakal
नाशिक

Nashik Crime News : नेपाळी युवकाच्या खुनामागे प्रेमप्रकरण? पोलिसांकडून कसून तपास; उकल होण्याच्या समीप

Crime News : पोलिस गुन्ह्याशी संबंधित पुरावे संकलित करीत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सातपूरच्या कामगार नगरमध्ये नेपाळी युवकाच्या खूनमागे प्रेमप्रकरण असल्याचे समोर आले असून संशयित मित्रानेच खून केल्याचे समजते. पोलिस गुन्ह्याशी संबंधित पुरावे संकलित करीत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. (Nashik Crime Love affair behind Nepali youth murder marathi news)

सातपूरच्या कामगार नगरमधील कौशल्य व्हिला येथे राहणारा युवक महेंद्रा प्रकाश सारकी (२२) याचा गळा चिरून खून केल्याची घटना सोमवारी (ता. १) सकाळी उघडकीस आली होती. याप्रकरणी सातपूर पोलिसात अज्ञात संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, मयत महेंद्रा सारकी हा एका मुलीच्या संपर्कात होता. तर त्याच्या समवेतच काम करणारा व एकाच फ्लॅटमध्ये राहणारा मित्रही त्याच मुलीच्या संपर्कात होता. त्यातून त्यांच्यात वादही झाला होता. याच कारणातून संशयित मित्राने रविवारी (ता. ३१) रात्री पुन्हा महेंद्रा याच्याशी वाद घातला आणि त्यातूनच त्याने त्याचा गळा चिरून खून केला. (latest marathi news)

तसेच इमारतीच्या टेरेसवरून त्यास खाली फेकून दिल्याचे समजते. याप्रकरणी सातपूर पोलिसांकडून दुजोरा दिला नसला तरी, या गुन्ह्याशी संबंधित कसून चौकशी आणि पुरावे पोलीस संकलित करण्याचे काम सुरू आहे.

मयत महेंद्रा हा पाईपलाईन रोडवरील एका हॉटेलमध्ये कुक होता. २०१७ पासून तो नाशिकमध्ये राहत होता. तर, त्याच हॉटेलमध्ये काम करणारे त्याचे १२-१४ साथीदार व महेंद्रा हे एका फ्लॅटमध्ये राहत होते. त्यामुळे गुन्ह्याच्या सुरवातीपासूनच पोलिसांचा संशय साथीदारांवर होता. पोलिसांकडून अजूनही कसून तपास सुरू आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT