Fraud Crime esakal
नाशिक

Nashik Crime News : नोकरीचे आमिष दाखवून घातला गंडा; अंबड पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Crime News : नात्यातील युवतीला आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल साडेतीन लाखांना गंडा घातला आहे

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : लग्नासाठीच्या संकेतस्थळावरून ओळख झाल्यानंतर मुलगी पाहण्यासाठी आलेल्या संशयिताने मुलीच्याच नात्यातील युवतीला आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तब्बल साडेतीन लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime Fraud by lured job)

अतुल शामराव चोपडे (रा. पुणे-बँगलोर हायवे, थोरात मळा, कराड, जि. सातारा) असे संशयिताचे नाव आहे. ज्योती गौतम गायकवाड (रा. विद्यालक्ष्मी हाईटस्‌, सिम्बॉयसीसजवळ, अंबड-लिंक रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या बहिणीच्या लग्नासाठी विवाहसंदर्भातील संकेतस्थळ मॅट्रिमोनीयल डॉट कॉमवर संशयित अतुल याच्याशी ओळख झाली होती.

त्यानंतर जून २०२३ मध्ये मुलीला पाहण्यासाठी संशयित नाशिकला आला होता. त्यावेळी संशयिताने मुलीच्या घरातील नातलगांशी ओळख परिचय झाला असता, त्याने ज्योती गायकवाड यांची मुलगी तनिष्का हिला आरोग्य खात्यातून नाशिक येथेच शासकीय नोकरी लावून देण्याचे सांगितले. त्यासाठी त्याने ३ लाख ५० हजार रुपयांची रक्कम त्याच्या बँक खात्यावर घेतली आहे. (latest marathi news)

मात्र, त्यानंतर पाठपुरावा केल्यानंतरही संशयिताने फिर्यादींच्या मुलीस नोकरीला लावून दिले नाही. तसेच, त्यांच्याकडून घेतलेले पैसेही परत केले नाहीत. यासंदर्भात विचारणा करूनही फायदा होत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी अंबड पोलिसात तक्रार दिली असून, त्यानुसार संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक किरण शेवाळे हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crude Oil Crisis: इंधन दरवाढीविरोधात उद्या राज्यभर आंदोलन! तुमच्या शहरात पेट्रोलचे भाव किती?

Raigad Fuel Hike: रायगडमध्ये डिझेल-पेट्रोल दरवाढ; ट्रॅक्टर-जेसीबी भाडे २०-२५ टक्क्यांनी वाढले, बळीराजा महागाईने होरपळला

Maratha Vadhu-Var Melava: जगदंब फाउंडेशनचा १०९ वा मोफत मराठा वधू-वर मेळावा उत्साहात; डॉ. नानजीभाई ठक्कर यांचे सर्व समाजासाठी मेळावे घेण्याचे आश्वासन

Railway Crime : पनवेल–नांदेड एक्सप्रेसमध्ये महिलेचे पाच तोळ्यांचे दागिने चोरी; दौंड लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल

Shirur Civic Action: शिरूर नगर परिषदेची अतिक्रमणांवर मोठी कारवाई; ९०हून अधिक टपऱ्या, शेड, भिंती जमीनदोस्त, तणावानंतर पोलिस बंदोबस्त

SCROLL FOR NEXT