crime esakal
नाशिक

Nashik Crime News : काजळे खुनप्रकरणातील मुख्य संशयित जेरबंद

Nashik Crime : पंचवटीतील संदेश काजळे याचे अपहरण करून खुन केल्याप्रकरणी फरार मुख्य संशयितास पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पंचवटीतील संदेश काजळे याचे अपहरण करून खुन केल्याप्रकरणी फरार मुख्य संशयितास पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नितीन उर्फ पप्पु चौघुले (४२, रा. मखमलाबाद रोड) असे अटक केलेल्या मुख्य संशयिताचे नाव असून, पोलिसांनी आत्तापर्यंत तिघांना अटक केली आहे. (Nashik Crime Kajale murder case marathi news)

निमाणी परिसरातून संदेश चंद्रकांत काजळे (३५) याचे संशयितांनी ९ फेब्रुवारी रोजी अपहरण करून खून केला होता. त्यानंतर संदेशचा मृतदेह मोखाडा येथे वाघ नदीकाठालगत जाळण्याचा प्रयत्न केला. मृतदेह अर्धवट जळाल्यानंतर संशयितांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल आहे. (latest marathi news)

पंचवटी पोलिसांनी तपास करीत सुरुवातीस स्वप्नील उन्हवणे, पवन भालेराव यांना अटक केली. ते न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार नितीन चौघुले हा सय्यद पिंप्री परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस नाइक राकेश शिंदे व अंमलदार कुणाल पचलौरे यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून संशयिताला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईतील धरणातील जलसाठा ८८ टक्क्यांवर, १० टक्के पाणीकपात कधी संपणार? महत्त्वाची माहिती समोर

Pune Bangalore Highway : पहिल्याच पावसात 6 पदरी महामार्गाचे पितळ उघडे! गांधी रुग्णालयाजवळ उड्डाणपुलाची भिंत कोसळली; प्रवास बनला धोकादायक, निकृष्ट कामाबद्दल कारवाई होणार का?

Pune News: आळेफाटा येथील जिल्हा परीषदेच्या शाळेजवळ अज्ञात व्यक्ती रात्रीच्या वेळी कचरा टाकणा-यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी

Latest Marathi News Live Update : भिवंडी इमारत दुर्घटना : दोषींवर कठोर कारवाईचे आदेश; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी भेट

Tourism: मध्य प्रदेश फिरायला जाणार असाल तर ही बातमी महत्त्वाची; पर्यटन क्षेत्रात होणार मोठे बदल; होमस्टे, जंगल सफारी आणि बरंच काही..

SCROLL FOR NEXT