Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : मालेगावला सहायक आयुक्तास 33 हजारांची लाच घेताना अटक!

Nashik News : मालेगाव येथील महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सचिन महाले यांना ३३ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : येथील महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सचिन महाले यांना ३३ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी अटक केली. या घटनेमुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. येथील तक्रारदार ठेकेदाराकडे सहाय्यक आयुक्त महाले यांनी जुन्या बांधकामाची चार देयके तसेच वॉर्ड नंबर १९ मधील वॉल कंपाउंडचे बजेट मंजूर करून देण्यासाठी ३३ हजारांची मागणी केली होती. (Malegaon Assistant Commissioner arrested for taking bribe)

संबंधित ठेकेदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या संदर्भात तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेत सापळा रचला.

ठेकेदाराने महाले यांना त्यांच्या कार्यालयात पैसे दिले. पथकाने पैसे घेताना शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास महाले यांना पकडले. (latest marathi news)

त्यांनी हे पैसे कोणाच्या सांगण्यावरून घेतले. यामागील धागेदोरे तपासले जात आहेत. पुढील चौकशीसाठी त्यांना येथील गिरणा शासकीय विश्रामगृहात आणण्यात आले.

त्यांची विश्रामगृहात अनेक तास कसून चौकशी सुरू होती. त्यांच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT