Nashik Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : बनावट दस्तऐवज करून भूमाफियांनी लाटला भूखंड; नाशिक रोड पोलिसात डॉक्टरांसह 5 जणांविरोधात गुन्हा

Nashik News : मखमलाबाद परिसरातील प्लॉटचे बनावट दस्तऐवज तयार करून दुय्यम निबंधकांसमोर बनावट महिला उभी करून प्लॉटच बळकावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मखमलाबाद परिसरातील प्लॉटचे बनावट दस्तऐवज तयार करून दुय्यम निबंधकांसमोर बनावट महिला उभी करून प्लॉटच बळकावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन डॉक्टरांसह संशयित महिला व एक व्यक्ती अशा पाच जणांविरोधात नाशिकरोड पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. (manner of grabbing plot itself by creating fake documents)

नितीन लखीचंद बिर्ला, सुलभा अमोल पवार, गजेंद्र रमेश अहिरराव, स्वाती रवींद्र वाघ, प्रशांत मधुकर पाटील अशी संशयितांची नावे आहेत. भारती प्रकाश अहिरे (रा. नाशिक रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती सेवानिवृत्त अधिकारी असून, त्यांनी १९८६ मध्ये मखमलाबाद शिवारात प्लॉट खरेदी केला होता.

हा प्लॉट भारती अहिरे यांच्या नावावर असून, त्याचा सातबाराही होता. दरम्यान, एप्रिल २०२४ मध्ये त्यांच्या मुलाने प्लॉटचा ऑनलाइन सातबारा मिळविण्याचा प्रयत्न केला असता, तो मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मखमलाबाद येथील तलाठीकडे त्यासंदर्भात चौकशी केली असता तो विक्री झाल्याचे निदर्शनास आल्याने अहिरे कुटुंबीयांना धक्का बसला. (latest marathi news)

यासंदर्भातील कागदपत्रांची पडताळणी केली असता, हा प्लॉट संशयित नितीन बिर्ला, सुलभा पवार आणि गजेंद्र अहिरराव यांनी खरेदी केल्याचे समोर आले. त्यासाठी संशयितांनी बनावट दस्तऐवज तयार केले आहेत. तसेच, संशयितांनी स्वाती वाघ या बनावट महिलेस भारती अहिरे म्हणून उभे केले.

बनावट दस्तावर असलेली भारती अहिरे यांची स्वाक्षरी खोटी असून, ती इंग्रजीत आहे. तर भारती अहिरे या मराठीत स्वाक्षरी करतात. यासंदर्भात दुय्यम निबंधक कार्यालयातील प्लॉटचे मूळ दस्तऐवजही गायब झाल्याचे समोर आले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच यासंदर्भात नाशिक रोड पोलिसात फिर्याद देत संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Drug Injections: हडपसरमध्ये नशेच्या इंजेक्शनची बेकायदा विक्री उघड; सराईत गुन्हेगार अभिषेक भडंगे अटक, ८२ बाटल्या जप्त

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Latest Marathi News Live Update : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार नाही, जय पवार यांची माहिती

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT