Marijuana worth 32 lakhs seized on Samriddhi esakal
नाशिक

Nashik Crime News : समृद्धीवर 43 लाखांचा गांजा पकडला; महाराष्ट्र सुरक्षा फोर्सची कारवाई

Nashik Crime : राज्याच्या विकासाला चालना देणारा म्हणून ओळखला जाणारा समृद्धी महामार्ग अमली पदार्थांच्या तस्करीचा नवा अड्डा बनू पाहत आहे.

अजित देसाई

सिन्नर : राज्याच्या विकासाला चालना देणारा म्हणून ओळखला जाणारा समृद्धी महामार्ग अमली पदार्थांच्या तस्करीचा नवा अड्डा बनू पाहत आहे. रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास समृद्धीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा फोर्सच्या गस्ती पथकाने महामार्गावर थांबलेल्या दोन वाहनांमधून तस्करी होणारा 42.96 लाखांचा सुमारे 214.800 किलो गांजा पकडला. सुरक्षारक्षकांना पाहून दोन्ही वाहनां सोबत असलेल्या व्यक्तींनी अंधारात धूम ठोकली. ( Marijuana worth 43 lakh seized on Samruddhi highway )

राष्ट्रीय महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय चव्हाणके, महाराष्ट्र सुरक्षा फोर्सचे सुरक्षा रक्षक आकाश सानप, ज्ञानेश्वर हेंबाडे संयुक्तपणे समृद्धी महामार्गावर गस्त घालण्यासाठी गोंदे टोल प्लाझा येथून शिर्डीच्या दिशेने निघाले होते. खंबाळे शिवारात चॅनल क्रमांक 557 या ठिकाणी अशोक लेलँड कंपनीचा ट्रक GJ 23/AT 8323 व सुझुकी कॅरी छोटा हत्ती टेम्पो MH 05/FJ 539 महामार्गावर मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या लेनवर उभा होता.

त्या ठिकाणी वाहनांमधून काही गोण्या क्रॉसिंग करण्यात येत असल्याचे पथकाचे निदर्शनास आले. पोलिसांनी थांबून विचारपूस केली असता दोन्ही वाहनांसोबत असणाऱ्या व्यक्ती अंधाराचा फायदा घेत समृद्धीची सुरक्षा भिंत ओलांडून पसार झाल्या. या वाहनांची तपासणी केली असता त्यात गोण्यांमध्ये गांजा असल्याचे आढळून आले. महाराष्ट्र सुरक्षा फोर्स चे प्रभारी मिलिंद सरवडे यांनी याबाबत वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांना कळवले. (latest marathi news)

श्री. पवार यांच्यासह उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, पारस वाघमोडे, हवालदार हेमंत कदम, सचिन काकड, गोविंद सूर्यवाड, साहेबराव बलसाने, सचिन कहाने यांनी धाव घेत दोन्ही वाहने ताब्यात घेतली. दोन्ही वाहनांमधून हस्तगत केलेल्या गोण्यांमध्ये असलेल्या गांजाचे वजन दोन क्विंटल पंधरा किलो भरले. त्याची बाजारातील किंमत सुमारे 42.96 लाख रुपये इतकी आहे. जप्त केलेल्या वाहनांची किंमत पंधरा लाख 47 हजार इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत पोलीस संशयितांचा परिसरात शोध घेत होते.

पिकअप जीप मधून दोन टन जनावरांचे मांस हस्तगत

समृद्धी महामार्गावरच दुसऱ्या घटनेत वाहतूक करण्यात येणारे दोन टन गोवंश मांस देखील मिळून आले. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गाच्या संभाजीनगर येथील नियंत्रण कक्षातून महामार्ग सुरक्षा पथकाचे प्रभारी मिलिंद सरवदे यांना मुंबईकडे जाणाऱ्या मार्गी केवळ शिवडे शिवारात चॅनल क्रमांक 582 वर एका पीक जीपचा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.

गोंदे टोल प्लाजा येथील मदत पथक अपघात स्थळी पोहोचल्यावर टायर फुटून पिकअप जीप क्रमांक MH13/CJ596 पुलाच्या भिंतीला दडपून अपघातग्रस्त झाली होती. या जीपमध्ये गोमांस असल्याचे निदर्शनास आल्यावर सिन्नरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना कळवण्यात आले. सिन्नर पोलीस ठाण्यातील सहाय्यक उपनिरीक्षक गोसावी यांनी सदर पिकप जीप ताब्यात घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT