crime esakal
नाशिक

Nashik Crime News : ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Nashik Crime : सातपूर औद्योगिक वसाहत परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन पीडितेला मित्राच्या घरी बोलावून संशयिताने बलात्कार केला. तसेच, घटनेची वाच्यता करू नये म्हणून धमकावलेही.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : सातपूर औद्योगिक वसाहत परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन पीडितेला मित्राच्या घरी बोलावून संशयिताने बलात्कार केला. तसेच, घटनेची वाच्यता करू नये म्हणून धमकावलेही. परंतु त्रास होऊ लागल्याने तिने घडलेल्या प्रकाराची माहिती कुटुंबीयांना दिली. याप्रकरणी सातपूर पोलिसात पोक्सोअन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयितही अल्पवयीन असल्याचे समोर येत आहे. (Nashik Crime Minor girl assaulted by taking advantage of identity marathi news)

पीडित मुलीने सातपूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, औद्योगिक वसाहत परिसरात राहणाऱ्या तिच्याच वयातील संशयित मुलाशी तिची ओळख झाली होती. त्यांच्यात वारंवार बोलणेही होत होते. दरम्यान, ओळखीचा गैरफायदा घेत, २८ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता संशयिताने पीडितेला त्याचा मित्र सोनू भोसले याच्या घरी बोलावले.

पीडिता त्याठिकाणी गेली असता, तिला संशयिताने घरात कोंडून घेत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच, घडलेल्या घटनेची कोठेही वाच्यता न करण्याची व कुटुंबीयांना जीवे मारण्याचीही धमकी दिली. त्यामुळे भेदरलेल्या पीडितेने माहिती दिली नाही.

परंतु गेल्या काही दिवसांपासून तिला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने तिने अत्याचाराची माहिती कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी याप्रकरणी सातपूर पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पीडितेच्या फिर्यादीनुसार पोक्सोसह बलात्कार आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक नळकांडे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT