Rape News esakal
नाशिक

Nashik Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपींना 20 वर्षे सक्तमजुरी

Crime News : सप्टेंबर २०१९ ते डिसेंबर २०२० यादरम्यान सदरचा प्रकार घडला असून, याप्रकरणी गंगापूर पोलिसात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : सातपूर येथील शिवाजीनगरमध्ये अवघ्या १३ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून अत्याचार केल्याप्रकरणी दोघा आरोपींना २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. तसेच, ३५ वर्षीय आरोपीला ३५ हजार तर, २० वर्षीय आरोपीला १० हजार रुपयांचा दंडही केला आहे. सप्टेंबर २०१९ ते डिसेंबर २०२० यादरम्यान सदरचा प्रकार घडला असून, याप्रकरणी गंगापूर पोलिसात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Crime Minor girl raped 20 years hard labor for accused)

वसंत तुकाराम गांगोडे (३५, रा. शिवाजीनगर, सातपूर), हरिदास पांडुरंग राऊत ऊर्फ सोनू (२०, रा. देवडोंगरा, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीनुसार, तिच्या राहत्या घराच्या पाठीमागे असलेल्या बाथरुममध्ये गेली असता, त्यावेळी संशयित वसंत गांगोडे याने बळजबरीने आतमध्ये घुसून तिच्यावर लैगिंग अत्याचार केले होते.

तर, पीडितेच्याच शाळेत शिकणारा आरोपी हरिदास राऊत याने तिच्याच घरी येऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केले होते. यातून पीडिता गर्भवती राहिली होती. तसेच, याप्रकरणी वाच्यता केल्यास चाकूने मारून टाकण्याची धमकीही दिली होती. याप्रकरणी गंगापूर पोलिसात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (latest marathi news)

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक निरीक्षक प्रविण सूर्यवंशी यांनी केला आणि न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायधीश श्रीमती मलकापट्टी रेड्डी यांच्यासमोर खटल्याचे काम चालले. सरकार पक्षातर्फे ॲड. सुलभा सांगळे यांनी साक्षीदार, पंचांची साक्ष तपासली.

आरोपीविरोधातील आरोप सिद्ध झाल्याने न्या. श्रीमती रेड्डी यांनी दोघा आरोपींना प्रत्येकी २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. तसेच, आरोपी गांगोडे यास ३५ हजार आणि आरोपी राऊत यास १० हजारांचा दंड केला आहे. पैरवी अधिकारी म्हणून महिला अंमलदार रिना आहेर, विजय पाटील, सहायक उपनिरीक्षक इकबाल पिरजादे यांनी पाठपुरावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Farmer Loan Waiver : साताऱ्यातील 31,556 शेतकरी पात्र! अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर; तुमच्या गावातील यादी 'येथे' पाहा

Mumbai Crime: लोक भवनाच्या नावाखाली रेल्वे तिकीट घोटाळा! खोटे शिक्के अन् राज्यपालांची बनावट सही, सूत्रधारासह ३ रेल्वे एजंट अटकेत

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! फिटमेंट फॅक्टरवर सरकारने पहिल्यांदाच मांडली अधिकृत भूमिका; संसदेत काय सांगितले?

Latest Marathi News Live Update : पुढील चोवीस तासांत विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

Prashant Kishor: "माझ्याच पोलीस ठाण्यात मला धमक्या, एकदा वर्दी काढली तर..."; SHO अन् प्रशांत किशोर यांच्यात वाद, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT