Crime_Rape esakal
नाशिक

Nashik Crime : धावत्या रेल्वेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; 6 महिन्यांपूर्वीची घटना

Latest crime news : रेल्वेच्या बाथरुममध्ये अल्पवयीन मुलीवर अज्ञात संशयिताने बलात्कर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भुसावळ येथून सुरतला जाणाऱ्या रेल्वेच्या बाथरुममध्ये अल्पवयीन मुलीवर अज्ञात संशयिताने बलात्कर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल असून, गंगापूर पोलिसात वर्ग करण्यात आला आहे. पीडितेच्या वडीलांच्या फिर्यादीनुसार, गेल्या १६ सप्टेंबर रोजी ते ट्रव्हल्सने नाशिकवरून सुरतला कामधंद्यासाठी पत्नी व मुलीसह जात होते. ( minor girl was raped in train 6 months ago )

त्यावेळी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने ते उपचारासाठी सुरतच्या शासकीय रुग्णालयात गेले असता, वैद्यकीय तपासणीत पीडित मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. यासंदर्भात पीडितेला विचारले असता, ५ ते ६ महिन्यांपूर्वी आई-वडलांसह पीडिता बसने भुसावळ येथे तेथून रेल्वेस सुरतकडे जात होते.

त्यावेळी पीडिता रेल्वेच्या जनरल बोगीतील बाथरुममध्ये गेली असता, त्यावेळी मास्क लावल्याने अज्ञात संशयित बळजबरीने बाथरुममध्ये घुसला आणि त्याने तिच्या अत्याचार केल्याचे तिने सांगितले. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोक्सो व बलात्काराप्रकरणी गंगापूर पोलिसात सदरचा गुन्हा वर्ग झाला आहे.

युवतीचा विनयभंग

नाशिक : रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी धमकावून मारहाण केल्याप्रकरणी संशयित युवकाविरोधात गंगापूर पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सनी धर्मवीर हटवाल (२४, रा. बागवानपुरा, द्वारका) असे संशयिताचे नाव आहे. पीडित युवतीच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता. ३) पीडिते क्लासच्या खाली उभी असताना संशयिताने तिचा फोन हिसकावून नेला.

नंतर तिला फोन देण्याच्या बहाण्याचे बोलावून घेतले असता, त्यावेळी तिला बळजबरीने कारमध्ये बसवून माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये रहा, असे म्हणाला. तिने नकार दिला असता संशयिताने तिला घाटात फेकून देण्याची, तसेच सदरचा प्रकार कोणाला सांगितल्यास आत्महत्त्या करेल अशी धमकी दिली. तसेच यापूर्वीही २२ सप्टेंबर रोजी संशयिताने तिला मारहाण करीत तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी गंगापूर पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Gas Shortage: जेजेतील कॅन्टीन सेवेला गॅसटंचाईचा फटका; विद्यार्थी, डॉक्टर, रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास

सिलिंडरसाठी रांगेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका, ६६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबियांकडून आर्थिक मदतीची मागणी...

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी बंद राहणार

SCROLL FOR NEXT