A team of Gangapur police with the suspect who was arrested in the case of forced theft esakal
नाशिक

Nashik Crime : मोबाईल चोरट्याला खंबाळ्यातून अटक

Crime News : इमारतीच्या पार्किंगमध्ये महिलेला चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावून नेणाऱ्या संशयिताला गंगापूर पोलिसांनी खंबाळ्यातून (ता. त्र्यंबकेश्वर) अटक केली आहे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : इमारतीच्या पार्किंगमध्ये महिलेला चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावून नेणाऱ्या संशयिताला गंगापूर पोलिसांनी खंबाळ्यातून (ता. त्र्यंबकेश्वर) अटक केली आहे. मयुर गजानन वांद्रेकर (२६, रा. यशोधन, शिवाजीनगर, सातपूर) असे संशयिताचे नाव आहे. (Nashik Crime Mobile thief arrested marathi news)

कार्तिकी अंबादास आहिरे (रा. दर्शिल अपार्टमेंट, शिवाजीनगर) यांच्या फिर्यादीनुसार, २३ तारखेला रात्री आठच्या सुमारास त्या पार्किंगमधून जात असताना अंधारात लपून बसलेल्या संशयित मयुर याने चाकूचा धाक दाखवून १० हजारांचा मोबाईल हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल होता.

गंगापूर पोलिस तपास करीत असताना संशयित मयुर खंबाळ्यात लपून बसल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून खंबाळ्यातील पारदेश्वर मंदिरातून अटक केली. न्यायालयाने त्यास एका दिवसाची कोठडी सुनावली आहे.

त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय भिसे, अंमलदार सुजित जाधव, गिरीश महाले, गणेश रेहेरे, सोनू खाडे यांनी कामगिरी केली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT