crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : मोबाईल चोरटा निघाला तडीपार गुंड; गुन्हेशाखेच्या युनिट एककडून अटक

Crime News : संशयित हा शहर-जिल्ह्यातून तडीपार असताना शहरात घरफोड्यात करीत असल्याचे तपासातून समोर आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : भद्रकाली हद्दीतील एका घरातून घुसून रोकड व मोबाईल चोरी करून घरफोडी करणार्या सराईत गुंडाच्या शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. संशयित हा शहर-जिल्ह्यातून तडीपार असताना शहरात घरफोड्यात करीत असल्याचे तपासातून समोर आले आहे. (Mobile thief turned out to be tadipar gangster)

आसिफ उर्फ काळ्या इस्माईल शेख (२५, रा. नानावली, कथडा , भद्रकाली) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे अंमलदार मुक्तार शेख यांना संशयित काळ्या हा चोरीचे मोबाईल विक्रीसाठी शिवाजी चौकात येणार असल्याची खबर मिळाली होती.

त्यानुसार, युनिट एकच्या पथकाने सापळा रचून संशयित काळ्या यास जेरबंद केले. त्याच्याकडून चोरीचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहे. तसेच, काळ्या यास गेल्या एप्रिल महिन्यात शहर-जिल्ह्यातून दीड वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेले होते. तरीही तो शहरात वावरत होता. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याकामी त्यास भद्रकाली पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (latest marathi news)

गेल्या आठवड्यात भद्रकालीतील मोलमजुरी करणाऱ्या कुटूंबियांचा घराच्या खिडकीचे गज तोडून पहाटाच्या सुमारास त्याने तीन मोबाईल व हजार रुपये चोरून नेले होते. याप्रकरणी भद्रकाली पोलीसात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे.

सदरची कामगिरी युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाकय निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुगन साबरे, महेश साळुंके, शरद सोनवणे, रमेश कोळी, अमोल कोष्टी, राहुल पालखेडे, राजेश राठोड, नितीन जगताप, समाधान पवार यांनी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

ICC WTC Teams: आयसीसी स्पर्धेत मोठा बदल! आता WTC मध्ये १२ संघांचा समावेश; ३ नव्या संघांना मिळणार संधी, पण कोणत्या?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती; केंद्राचे सर्व राज्यांना निर्देश

SCROLL FOR NEXT