Court Order esakal
नाशिक

Nashik Crime News : उज्जैनवाल-बेद टोळीविरोधात मोक्काची कारवाई; आयुक्तांचा दणका

Crime News : उपनगर, नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहुल उज्जैनवाल आणि मयुर बेद या दोन टोळ्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने धुमश्चक्री सुरू होती

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : उपनगर, नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहुल उज्जैनवाल आणि मयुर बेद या दोन टोळ्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने धुमश्चक्री सुरू होती. त्यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण होते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दोन्ही टोळ्यांविरोधात मोक्काअन्वये कारवाई केली आहे.

आयुक्तांच्या या दणक्याने शहरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. याचप्रमाणे, गंभीर गुन्ह्यात शिक्षा सुनावलेले वा गुन्ह्यांमध्ये जामिनावर बाहेर आलेल्या गुन्हेगारांविरोधातही पोलीस आयुक्तांनी कठोर कारवाई करावी, अशीही चर्चा जागरुक नागरिकांमध्ये आहे. (Nashik Crime Mokka operation against Ujjainwal Bed gang nashik police Commissioner action marathi news)

मयुर चमन बेद आणि राहुल उज्जैनवाल या टोळ्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने हाणामारीच्या घटना सुरू होत्या. गेल्याच महिन्यात बेदच्या टोळीने उज्जैनवाल याच्या घरासमोर जाऊन राडा केला आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

तसेच संशयितांनी गावठी कट्ट्यातून दोन फायरिंगही केल्या होत्या. यामुळे परिसरात दहशत होती. याशिवाय बेद टोळीविरोधात गंभीर स्वरुपाचे २१ गुन्हे उपनगरसह नाशिकरोड, इंदिरानगर, अंबड या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असल्याने अखेर या टोळीविरोधात मोक्काअन्वये कारवाई करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे, राहुल उज्जैनवाल याच्या टोळीने गेल्या फेब्रुवारी महिन्यात दोघा-तिघांवर प्राणघातक हल्ला केला होता. याप्रकरणी उपनगर पोलिसात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हाही दाखल आहे. उज्जैनवाल टोळीविरोधात प्राणघातक हल्ल्यासह खंडणी, अवैध शस्त्रयासह २१ गुन्हे उपनगर, नाशिकरोड, इंदिरानगर या पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहे. याची दखल घेत उज्जैनवाल टोळीविरोधात मोक्काअन्वये कारवाई करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

उज्जैनवाल टोळी

- टोळीचा प्रमुख सूत्रधार राहुल अजय उज्जैनवाल (२४, रा. साईश्रद्धा अपार्टमेंट, जय भवानीरोड, नाशिकरोड), विजय उर्फ किशन सरजित बेहनवाल (२६), गौरव उर्फ गणेश सुनील सोनवणे (२६), प्रदीप उर्फ गणेश विठ्ठल काळे (२४), नईम मेहबुब शाह (२२), प्रदीप उर्फ सोनू सोमनाथ कापसे (रा देशमुखवाडी, एकलहरा रोड), तिलक मेहरोलिया (रा. जेलरोड)

बेद टोळी

- टोळीचा प्रमुख सूत्रधार मयुर चमन बेद, संजय चमन बेद ( ३९, रा. फर्नांडिसवाडी, नाशिकरोड), टकूउर्फ सनी रावसाहेब पगारे (३१, रा. जेतवननगर, जय भवानीरोड), गौरव बबन गंडाले (२१, रा. फर्नांडिसवाडी), इर्षाद महंमदअली चौधरी (२७ ( रा. मुहमदीया पॅलेस, देवळाली गाव), बारक्या उर्फ श्रीकांत वाकुडे (रा. जेतवननगर, जय भवानीरोड), दीपक उर्फ चैत्या निवृत्ती रिपोटे, नितेश कनोजिया, यश राजेंद्र पगारे, रोहित गोविंद उर्फ माले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT