Two suspects who have been stealing mopeds for six years. A team from Unit Two of the City Crime Branch along with esakal
नाशिक

Nashik Crime News : मोपेड चोरून 6 वर्षे वापरली! दोघा संशयितांच्या आवळल्या मुसक्या

Crime News : सिटी सेंटर मॉलच्या पाठीमागील पार्किंगमधून सहा वर्षांपूर्वी मोपेड चोरून वापरणाऱ्या दोघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : सिटी सेंटर मॉलच्या पाठीमागील पार्किंगमधून सहा वर्षांपूर्वी मोपेड चोरून वापरणाऱ्या दोघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या. शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने सदरची कामगिरी केली आहे. (Nashik Crime Moped stolen two suspects arrested)

रोहित राजेंद्र पगारे (२५, रा. भगवती अपार्टमेंट, माणेकशानगर, काठेगल्ली), राहुल देविदास मुसळे (४६, रा. अंबिका अपार्टमेंट, पाटीलनगर, सिडको) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. युनिट दोनचे अंमलदार विशाल पाटील यांना, संशयित विना नंबरप्लेटची प्लेझर मोपेड वापर असल्याची खबर मिळाली होती.

त्यानुसार पथकाने संशयित रोहित पगारे यास सापळा रचून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने संशयित राहुल मुसळे याच्या मदतीने सिटी सेंटर मॉलच्या पाठीमागील पार्किंगमधून २०१८ मध्ये मोपेड चोरून नेल्याची कबुली दिली. याप्रकरणी गंगापूर पोलिसात मकरंद दामोदर जोशी (रा. देहमंदिर हौसिंग सोयायटी, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल आहे. संशयितांकडून मोपेड जप्त करण्यत आली आहे. (latest marathi news)

मोपेड सापडल्याने जोशी यांनी पोलिसांचे कौतूक केले. सदरची कामगिरी युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल पाटील, नंदकुमार नांदुर्डीकर, सुहास क्षीरसागर, शंकर काळे, नितीन फुलमाळी, संजय पोटिंदे, प्रवीण वानखेडे यांनी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Frank Caprio : प्रसिद्ध अमेरिकन न्यायाधीश फ्रँक कॅप्रियो यांचे निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी घेतला अखेचा श्वास

Yavatmal Accident: शिक्षकांना ने-आण करणाऱ्या ट्रॅव्हलरला ट्रकची धडक; १२ शिक्षक जखमी, चार गंभीर, जीवितहानी नाही

सोलापुरात रोखले १५१ बालविवाह! मेच्या उन्हाळी सुटीत सर्वाधिक बालविवाह; आता बालविवाह जमविणारे, विवाहाला आलेले व विवाह लावणाऱ्यांना होणार ‘एवढी’ शिक्षा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात घरच्या घरी बनवा स्प्राउट अन् पनीर कबाब, सोपी आहे रेसिपी

Manoj Jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात; २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाचा निर्धार, मांजरसुंबा येथे अंतिम इशारा सभा

SCROLL FOR NEXT