Nashik Crime News minor girl kidnapped released and suspect arrested in malegaon esakal
नाशिक

Nashik Crime News : मालेगावी अल्पवयीन मुलीचे अपहरण, सुटका अन्‌ संशयिताला अटक

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शहरातील कॅम्प भागातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याच्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु होती. या प्रकरणातील अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात कॅम्प पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सुरत येथून या मुलीला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार इमरान राजू शेख (रा. पंचशील नगर, कॅम्प) याला अटक करण्यात आली आहे. इमरानला सोमवारी (ता. १४) सायंकाळी येथील न्यायालयात उभे केले असता त्याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

विश्‍व हिंदू परिषद, धर्मप्रसार समितीच्या पुढाकारातून हा विषय मार्गी लागला. या प्रकरणात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालयासह खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी लक्ष केंद्रीत केल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. अपहरणाचा प्रकार सध्या चर्चेत असलेल्या लव्ह जिहादचा असल्याचे साधारणपणे घटनाक्रमावरुन निदर्शनास येते. सुत्रधारासह या प्रकरणातील सर्व संशयितांना अटक करावी, अशी मागणी विहिंपच्या ॲडव्होकेट मंजुषा कजवाडकर, विहिंपचे जिल्हा सहमंत्री मच्छिंद्र शिर्के व विहिंप धर्मप्रसार मालेगाव जिल्हाप्रमुख भावेश भावसार यांनी सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

श्रीमती कजवाडकर म्हणाल्या, की अल्पवयीन मुलीला तिची प्रकृती बरी नसल्याची संधी साधून २४ ऑक्टोबर २०२२ उपचाराच्या नावाने इमरानने मोसमपूल येथे बोलाविले. २५ ऑक्टोबरला पिडीतेच्या आईने कॅम्प पोलिस ठाण्यात तक्रार दिली. इमरानने येथून तिला टॅक्सीतून नाशिकला व त्यानंतर रत्नागिरीमधील लांजा जवळील मुंजारवाडी येथे नेण्यात आले. येथे इमरानचा आतेभाऊ पत्नीसह वास्तव्याला आहे. पिडीतेला येथेच ठेवण्यात आले होते. या कालावधीत तिला मांत्रिकाकडे नेऊन उपचार करीत तिच्या गळ्यात तावीज बांधण्यात आला.

तिचे धर्मांतरण करून शाबिया नाव ठेवण्यात आले. काझीकडे नेऊन जबरदस्तीने निकाह लावण्याचा प्रयत्न मुलीने नकार दिल्याने अपयशी झाला. यानंतर पिडितेने मला घरी जायचे आहे असा लकडा लावल्यानंतर संशयितांनी तिला दमबाजी केली. त्यानंतर दोन आठवड्याने विहिंपने पाठपुरावा करीत अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन व मोर्चाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांची चौकशीची चक्रे फिरली. पोलीस शोध घेत असल्याचा सुगावा लागताच इमरान, त्याचा आतेभाऊ शाबीर व त्याची पत्नी अस्मा यांनी पिडितेला सुरतला इमरानच्या आत्याकडे नेले.

या दरम्यान मुंजारवाडी येथे पिडितेशी अतिप्रसंग व दुरव्यवहार करण्यात आला. तब्बल १७ दिवसानंतर अल्पवयीन पिडितेला पोलीसांनी सुरत येथून ताब्यात घेतले. इमरानला अटक करण्यात आली आहे. यातील संशयित इमरानचा आतेभाऊ शाबीर व त्याची पत्नी अस्मा, सुरत येथील आत्या हे अद्यापही मोकळे आहेत. त्यांच्यासह इमरानच्या कुटुंबियांनाही या प्रकाराची पुर्णत: कल्पना होती. कुटुंबिय, मदत करणारे संशयित मंत्र तंत्र करणारा मांत्रिक तसेच धर्म व नाव बदलवणारा काझी, इमरानला मदत करणारा त्याचा मित्र समीर मणियार यांसह सर्व संशयितांना अटक झाली पाहिजे अशी मागणी श्रीमती कजवाडकर, श्री. शिर्के, श्री. भावसार यांनी केली.

अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. कॅम्प पोलिस ठाण्यात बलात्कार, बालकांचा लैंगिक अपराध (पोस्को), अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपअधिक्षक प्रदीपकुमार जाधव तपास करीत आहेत.

सहकार्याबद्दल लोकप्रतिनिधी व पोलिसांचे आभार

पिडीतेची आई अनुसूचित जाती-जमातीची आहे. पिडितेच्या वडिलांचे निधन झाले आहे. प्लॅस्टिक गोळा करुन मायलेकी उदरनिर्वाह करतात. त्यांना न्याय मिळवून देणारे कोणीही नव्हते. विहिंपच्या कार्यकर्त्यांनी यात लक्ष केंद्रीत केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालयातून दुरध्वनी आल्यानंतर तपासाची चक्रे फिरली. खासदार डॉ. भामरे यांनीही जातीने लक्ष घातले. जिल्हा पोलिस अधिक्षक शहाजी उमाप, उपअधिक्षक श्री. जाधव, कॅम्प पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रकाश काळे, उपनिरीक्षक एस. एस. देशमुख यांनी सहकार्य केल्याने या प्रकरणाचा छडा लागला. त्या सर्वांचे आभारी असल्याचे विहिंपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT