crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : ‘हॉटेल द फॉरेस्ट’वर पोलिसांची धाड; हुक्का पार्लर होते सुरू

Nashik Crime : गोवर्धन शिवारातील हॉटेल द फॉरेस्ट मल्टी क्युझन येथे नाशिक तालुका पोलिसांनी शनिवारी (ता. १७) मध्यरात्री छापा टाकला असता, त्याठिकाणी अवैद्य मद्यविक्री केली जात असल्याचे आढळून आले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : गोवर्धन शिवारातील हॉटेल द फॉरेस्ट मल्टी क्युझन येथे नाशिक तालुका पोलिसांनी शनिवारी (ता. १७) मध्यरात्री छापा टाकला असता, त्याठिकाणी अवैद्य मद्यविक्री केली जात असल्याचे आढळून आले. तसेच, चोरीछुप्यारितीने हुक्का पार्लरही याठिकाणी चालविला जात असल्याचे निष्पन्न झाले. (Police raid on Hotel The Forest)

याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालक व व्यवस्थापकाला अटक केली आहे. दरम्यान, या हॉटेलवरील कारवाई रोखण्यासाठी गंगापूर रोड परिसरातील एका महिलेने पोलिसांवर ‘राजकीय’ दबाव आणत पोलीस ठाण्यात धिंगाणा घातल्याचे समजते.

हॉटेल द फॉरेस्टचा व्यवस्थापक ओवेस अश्पाक शेख (३०, रा. आयशा रेसीडेन्सी, अशोका मार्ग), हॉटेल मालक जकी मोहम्मद हनिफ शेख (२४, रा. कांचन अपार्टमेंट, पखालरोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत.

नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांना गोवर्धन शिवारातील हॉटेल फॉरेस्टमध्ये अवैधरित्या मद्यविक्री व हुक्का पार्लर चालविला जात असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, शहानिशा केल्यानंतर तालुका पोलिस पथकाने शनिवारी (ता.१७) मध्यरात्रीच्या सुमारास छापा टाकला असता, त्यावेळी हॉटेलमध्ये अवैधरित्या मद्यपींना विदेशी मद्याची विक्री करीत पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती.

तसेच, हॉटेलच्या काही खोल्यांमध्ये ग्राहकांसाठी हुक्का पार्लरचीही व्यवस्था करण्यात आली होती. पोलिसांनी अवैध मद्यसाठा, हुक्क्याचे साहित्य व प्रतिबंधित असलेली सुगंधीत फ्लेवर असा १८ हजार ५०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी नाशिक तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय अधिकारी बापूसाहेब दडस यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या पथकाने केली.

दबाव टाकणारे ‘ते’ कोण?

दरम्यान, हॉटेल फॉरेस्टवर पोलीसांनी छापा टाकल्याची माहिती कळताच गंगापूर रोड परिसरातील एक महिलेने धाव घेत सदरची कारवाई रोखण्यासाठी ‘राजकीय’ दबाव आणला. त्याचवेळी एका राजकीय लोकप्रतिनिधींने मध्यस्थीही पाठविला. त्यांनीही कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. सदर महिलेने तर पोलिसांसमोर धिंगाणा घालत धमकावल्याचेही समजते. यामुळे सदरची महिला व तो मध्यस्थी करणारा कोण, अशीही चर्चा पोलीस व शहरात सुरू आहे. 

लपवाछपवी का?

पोलिसांच्या छाप्यात अवैध मद्यसाठा व हुक्क्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. तसेच, हॉटेल मालक व व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परंतु त्याचवेळी हॉटेलमध्ये अवैधरित्या मद्यपान व हुक्का ओढणार्या ग्राहकांविरोधात कोणतीही कारवाई केलेली नाही. या ग्राहकांमध्ये कोणी मोठे ‘आसामी’ होते का, ज्यामुळे ग्राहकांवर कारवाई करणे पोलिसांनी टाळले. ही लपवाछपवी का, असाही प्रश्न या कारवाईतून उपस्थित होतो आहे.

''पोलिसांना माहिती मिळाली असता, त्यानुसार हॉटेल फॉरेस्टवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई रोखण्यासाठी कोणाकडूनही पोलिसांवर दबाव आलेला नाही. अवैध व्यवसायाविरोधात पोलिसांची कारवाई सुरूच राहील. ''- सत्यजित आमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नाशिक तालुका पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी ५ हजार मतदान केंद्र

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Latest Marathi News Live Update: राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती - अतुल सावे

SCROLL FOR NEXT