Two arrested for stealing boxes of styles from construction site esakal
नाशिक

Nashik Crime News : साईटवरून स्टाईल्सचे बॉक्स चोरणार्या दोघांना अटक

Nashik Crime : बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या स्टाईल्स फरशींचे बॉक्स चोरी करणार्या दोघा संशयितांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : पाथर्डी फाटा परिसरात सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या स्टाईल्स फरशींचे बॉक्स चोरी करणार्या दोघा संशयितांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने सदरची कामगिरी केली असून, दोघांचा शोध सुरू आहे. संशयितांकडून चोरीचा मुद्देमालही जप्त केला आहे. (Nashik Crime)

युवराज मोहन मते (३०, रा. पाथर्डी गाव, नाशिक), सचिन देवराम तळपाडे (२९, रा. सोमठाणे, ता. अकोले, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे असून, भगवान खोकले (रा. पाचपट्टा, ता. अकोले, जि. अहमदनगर), सोनू राठोड (रा. पाथर्डी गाव, नाशिक) हे दोघे पसार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

घनश्याम नथुराम कुमावत (रा. डीजीपीनगर, वडाळारोड) यांच्या फिर्यादीनुसार, कुमावत यांनी पाथर्डी फाटा परिसरात सुरू असलेल्या बांधकाम इमारतीला स्टाईल्स फरशा पुरविण्याचा ठेका घेतलेला होता.

या बांधकाम इमारतीच्या ठिकाणी काम करणार्या चौघा संशयितांनी नोव्हेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या दरम्यान राघव हाईटस्‌ या बांधकाम साईटवर असलेल्या सुमारे ४८ हजार रुपयांच्या स्टाईल्सची चोरी केल्या होत्या. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल आहे.

सदरील गुन्ह्याचा शहर गुन्हेशाखेचे युनिट दोनचे पथक समांतर तपास करीत होते. त्यावेळी पथकाचे हवालदार राजेंद्र घुमरे यांना काही संशयित हे स्टाईल्स चोरत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पथकाने संशयति मते, तळपाडे या दोघांना सापळा रचून अटक केली. पोलिसी खाक्या दाखवित चौकशी केली असता संशयितांनी स्टाईल्स चोरीची कबुली दिली.

संशयित खोकले व राठोड यांच्या साथीने स्टाईल्स चोरी केल्याचीही कबुली दिली. अटक केलेल्या संशयितांकडून ४५ हजारांच्या चोरीच्या स्टाईल्स जप्त केल्या असून, त्यांना तपासाकामी इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदेश पाडवी, हवालदार राजेंद्र घुमरे, चंद्रकांत गवळी, संजय सानप, विजय वरंधळ, परमेश्वर दराडे यांनी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 : पाकिस्तानी वंशांच्या क्रिकेटपटूला T20 World Cup साठी भारताने व्हिसा नाकारला; सोशल मीडियावर लिहितो की...

Belly Fat Reduction: पोटाची चरबी कमी करायची आहे? हार्वर्ड डॉक्टरांकडून जाणून घ्या डाएटचं बेस्ट फॉर्मुला

Latest Marathi News Live Update : जामडी गावात माजी सरपंचाच्या मुलाची धारदार शस्त्राने हत्या

Pandharpur Politics : 'आमदार आवताडेंनी पंढरपुरात भाजपचे सहा उमेदवार पाडले'; पराभूत महिला उमेदवाराच्या पतीचा गंभीर आरोप, अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Shiv Thakare: अखेर त्या अफवा खोट्या ठरल्या; शिव ठाकरेने सांगितलं 'त्या' व्हायरल फोटोमागचं सत्य

SCROLL FOR NEXT