Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : मालेगावात तरुणाचा खून; संशयिताला अटक

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : येथील नुमानीनगर भागातील शेख सुलेमान शेख शकील या तरुणाचा खून करण्यात आला. शहरातील गांधीनगर गल्ली नं. २ मध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्या सुरत येथील आरिफ खान आसिफ खान याने सुऱ्यासारख्या हत्याराने भोसकून शेख सुलेमानचा खून केला. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी आरिफ खानला अटक केली आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

सुरत येथील आरिफ खान काही दिवसांपासून येथील गांधीनगर भागात भाडेतत्त्वावरील घरात राहत होता. शेख सुलेमानने त्याला मोबाईल दिला होता. मोबाईल घेण्यासाठी शेख सुलेमान गेला असता आरिफ खानने त्याला मारहाण केली. नशेत असलेल्या आरिफ खानने शेख सुलेमानच्या पोटात सुऱ्यासारख्या हत्याराने वार केले. गंभीर जखमी झालेल्या सुलेमानला नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी तातडीने येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले.

विशेष म्हणजे आरिफ खानदेखील सामान्य रुग्णालयापर्यंत सर्वांसोबत आला. डॉक्टरांनी शेख सुलेमानला मृत घोषित करताच आरिफ खानने तेथून पळ काढला. सुलेमानच्या नातेवाइकांनी पाठलाग करत आरिफ खानला कालीकुट्टी नजीक मोसम नदीच्या किनारी पकडले. दरम्यानच्या काळात रुग्णालय प्रशासनाने शहर पोलिसांना माहिती कळविली. आरिफ खानला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT