Facebook Crime esakal
नाशिक

Nashik Crime News : फेसबुकवर अश्‍लील मजकूर; संशयिताविरोधात गुन्‍हा दाखल

Latest Crime News : २०२२ मधील या प्रकाराबाबत नवी दिल्‍लीतील नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आदेशानंतर संशयित वापरकर्त्याविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. सायबर पोलिसांकडून संशयिताचा शोध सध्या सुरु आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : फेसबुक खात्‍याचा वापर करताना त्‍यावर अल्‍पवयीन मुलांशी निगडित आक्षेपार्ह व अश्‍लील दृश्‍य व मजकूर प्रसारित करणाऱ्या वापरकर्त्याविरोधात गुन्‍हा दाखल झाला आहे. २०२२ मधील या प्रकाराबाबत नवी दिल्‍लीतील नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आदेशानंतर संशयित वापरकर्त्याविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. सायबर पोलिसांकडून संशयिताचा शोध सध्या सुरु आहे. (Obscene text on Facebook case against suspect)

याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात कार्यरत सहायक पोलिस निरीक्षक प्रतीक पाटील यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, संशयिताने २२ ऑक्‍टोबर २०२२ रोजी फेसबुक खात्‍याचा वापर करताना त्‍यावर चाइल्ड पोर्नोग्राफी व इतर अश्‍लील व्‍हिडीओसंदर्भातील साहित्‍य प्रसारित केले होते. संबंधिताच्‍या प्रोफाइल संदर्भातील गोपनीय माहिती, पुराव्‍यांसह तक्रार दाखल करण्यात आली होती.

यानंतर दी नॅशनल सेंटर फॉर मिसिंग ॲण्ड एक्‍सप्‍लॉयटेड चिल्ड्रेन (एनसीएमईसी) यांच्‍यामार्फत नवी दिल्‍लीतील नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार पोच केली. यानंतर संशयिताविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्‍या कलम ६७ (ब) अन्‍वये गुन्‍हा दाखल केला आहे. (latest crime news)

आक्षेपार्ह पोस्ट; संशयितावर गुन्‍हा

फेसबुकवरुन आक्षेपार्ह पोस्‍ट करताना समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्‍न करणाऱ्या संशयिताविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल केला आहे. विनोद पोखरकर यांनी याप्रकरणी श्रावण देवरे विरोधात फिर्याद दिली आहे.

नवी मुंबईतील रहिवासी पोखरकर यांनी १ ऑक्‍टोबरला त्‍यांचे फेसबुक अकाउंट वापरत असताना, संशयित देवरेने आक्षेपार्ह मजकूर टाकला. दोन समाजामध्ये, दोन गटांमध्ये शत्रुत्‍वाची व द्वेषाची भावना निर्माण करण्याच्‍या उद्देशाने हा मजकूर टाकल्‍याचे फिर्यादीत म्‍हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : यमुना नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई

SCROLL FOR NEXT