Murder News esakal
नाशिक

Nashik Crime News : प्रेम प्रकरणातील वादातून वृध्दाची हत्या; तीन सख्खा भावांसह पुतण्या गजाआड

Crime News : आरोपींचा मयत पुतण्या वासुदेव यशवंत बागुल वय २२ व मयत वृध्द देवराम गावित यांच्या नात्यातील एका मुलीशी प्रेम प्रकरण होते. सदर मुलगी व आरोपींचा पुतण्या हे एकाच गावातील होते अन...

सकाळ वृत्तसेवा

सुरगाणा : पायरपाडा हतगड येथे तीन सख्खे भाऊ व पुतण्या या चौघांनी मिळून वृध्दाला दांडक्याने मारझोड केल्याने वृध्द ठार झाल्याने चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime Old man killed due to love dispute)

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक ११ जुलै रोजी संशयित आरोपी पांडुरंग रामू बागुल वय ४०, गोपाळ रामू बागुल वय ५५, चंदर रामू बागुल वय ५३, सोमनाथ चंदर बागुल वय ३० सर्व राहणार हतगड यांनी मयताची वृध्द पत्नी भीमाबाई देवराम गावित वय ५७, व मयत देवराम हरी गावित वय ६४ रा. यांना दांडक्याने बेदम मारझोड केल्याने १२ जुलै रोजी वृध्दाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

यामागील हकीकत अशी की, आरोपींचा मयत पुतण्या वासुदेव यशवंत बागुल वय २२ व मयत वृध्द देवराम गावित यांच्या नात्यातील एका मुलीशी प्रेम प्रकरण होते. सदर मुलगी व आरोपींचा पुतण्या हे एकाच गावातील होते. ११ जुलै रोजी वासुदेव बागुल यांने प्रेम विरहातून ओढणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या हत्या केली होती. (latest marathi news)

याचाच राग आरोपींनी मनात धरून तुमच्याच मुळे आमच्या पुतण्याने आत्महत्या केली. याचा राग मनात धरून चौघांनी दांडक्याने मारझोड केल्याने वृध्दाचा मृत्यू झाल्याने १४ जुलै २०२४ रोजी चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

यामध्ये चौघांना पोलीस कोठडी दिली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित पाटील, शिवराम गायकवाड, चेतन बागुल, कैलास मानकर, जगदीश घुटे, अनिल चारोस्कर यांच्या तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirmala Nawale: निर्मला नवले यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी; जिल्हा परिषद निवडणुकीत पराभवानंतरही संघटनेत स्थान

Uruli Kanchan Garbage: उरुळी कांचनमधील पद्मश्री मणिभाई देसाई कॉलेजच्या प्रवेशद्वारावर कचराकुंड्यांचे साम्राज्य; विद्यार्थ्यांचे ‘कचरा स्वागत’

Marathi News Live Updates: संसदेत १२ ऑगस्टला FCRA विधेयक मांडले जाण्याची शक्यता

Pune illegal hill cutting issue: पुण्यात टेकडीफोडीला लगाम घाला; बेकायदेशीर बांधकामे थांबवा, परवानग्या रद्द करण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश

Pune Civic Tenders: महापालिकेच्या रखडलेल्या शेकडो कोटींच्या निविदा दोन दिवसांत मार्गी लावा; राजकीय दबावाला बळी न पडण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे आदेश

SCROLL FOR NEXT