Suspect arrested with Gavathi Kattya from Palase area. including the Special Squad of the Crime Branch esakal
नाशिक

Nashik Crime News : पळसे येथे गावठी कट्ट्यासह एकाला अटक

Crime News : नाशिकरोड परिसरातील पळसे येथे गावठी कट्ट्यासह तीन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकरोड परिसरातील पळसे येथे गावठी कट्ट्यासह तीन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या संशयिताला अटक करण्यात आली आहे. शहर गुन्हेशाखेच्या विशेष शाखेच्या पथकाने सदरची कामगिरी केली असून, नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime One arrested with gavthi Katta Palase news)

योगेश प्रल्हाद आहेर (३९, रा. मगर मळा, एकलहरा रोड, नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे. पळसे परिसरामध्ये गावठी कट्ट्यासह संशयित येणार असल्याची खबर विशेष शाखेचे अंमलदार दत्ता चकोर यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने पळसे परिसरातील आशीर्वाद बिल्डींगच्या आसपास सापळा रचला. संशयित आहेर हा पायी चालत आला असता, दबा धरून असलेल्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. (latest marathi news)

त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे असा ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी अंमलदार भगवात जाधव यांच्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड, दिलीप सगळे, दत्ता चकोर, भूषण सोनवणे, चारुदत्त निकम, भगवान जाधव यांच्या पथकाने बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT