Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : वावी विद्यालय परिसरात स्वयंघोषित दादा अन भाईंची दहशत; प्राणघातक हत्याराने केले एकास जखमी

Latest Crime News : शिक्षणासाठी बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थिनी विद्यार्थ्यांना त्रास देण्याचा प्रकार अलीकडच्या काळात वाढला आहे. या प्रवृत्तींचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील वावी येथील रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत स्वयंघोषित दादा व भाईंनी दहशत निर्माण केली आहे. शिक्षणासाठी बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थिनी विद्यार्थ्यांना त्रास देण्याचा प्रकार अलीकडच्या काळात वाढला आहे. या प्रवृत्तींचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे. (Vavi Vidyalaya area One injured by deadly weapon)

वावी विद्यालयात पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग भरवले जातात. परिसरातील आठ ते दहा गावातील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. विद्यालय भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत परिसरात काही टवाळखोरांचा उपद्रव वाढला आहे. स्वतःला दादा व भाई म्हणवून घेणाऱ्यांकडून विद्यार्थिनी, विद्यार्थ्यांना त्रास देण्याचा प्रकार सतत होत असतो.

विशेषता बाहेरगावून येणाऱ्या विद्यार्थ्यांना या त्रासाला नेहमीच सामोरे जावे लागते. हे टवाळखोर विद्यालयाच्या परिसरात असलेल्या दुकानांमध्ये तसेच मंदिरांजवळ थांबून असतात. रस्त्याने जाणाऱ्या विद्यार्थिनींच्या छेडछाडीबरोबरच विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचे प्रकार देखील या टवाळखोरांकडून केले जातात.

सोमवारी कनिष्ठ महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याला या टवाळखोरांनी टार्गेट केले. त्याला शिवीगाळ व मारहाण केली. याबाबत मुख्याध्यापकांकडे तक्रार करण्यासाठी जाणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांचा मामा ऋषिकेश अर्जुन दिघे रा. दुसंगवाडी यांना विद्यालयाच्या परिसरातच अडवून मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडला. लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यासोबतच सदर टवाळखोरांकडून फायटर, चोपर सदृश्य हत्याराने दिघे यांच्यावर वार करण्यात आले. (latest marathi news)

त्यात त्यांच्या डोक्याला सहा ते सात टाके पडून दुखापत झाली. सदर घटनेनंतर शाळा प्रशासनाने शाळाबाह्य व्यक्तींकडून शाळेच्या परिसरात होणारा उपद्रव कमी व्हावा तसेच गुन्हेगारी प्रकार करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध कारवाई करावी यासाठी पोलिसांना पत्र दिले. वावी, पांगरी, कहांडळवाडी, घोटेवाडी, दुसंगवाडी येथील पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत दिघे यांना प्राणघातक मारहाण करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली.

वावी गावातीलच ओम गायकवाड, रुद्र गायकवाड, राम गायकवाड, कृष्णा गायकवाड या तरुणांच्या विरोधात पोलिसांनी श्री.दिघे यांच्या तक्रारीवरून मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. शाळेशी संबंधित नसताना अनेक टारगट तरूण नेहमीच शाळेच्या परिसरात घोटाळत असतात. रस्त्याने जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास देणे, विद्यार्थिनींची छेड काढणे असे प्रकार या स्वयंघोषित दादा व भाईंकडून होत असते. त्यांच्या दहशतीमुळे विद्यार्थी तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT