Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : पोलिस ठाण्यात येऊन पोलीस अंमलदारास मारहाण; आरोपीला शिक्षा

Crime News : पोलीस अंमलदारास शिवीगाळ करीत मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला सत्र न्यायालयाने सहा महिने साधा कारावास व ६ हजारांचा दंड ठोठावला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : आडगाव पोलिस ठाण्यात येऊन पोलीस अंमलदारास शिवीगाळ करीत मारहाण केल्याप्रकरणी आरोपीला सत्र न्यायालयाने सहा महिने साधा कारावास व ६ हजारांचा दंड ठोठावला आहे. २०१७ मध्ये सदरची घटना घडली होती. (Nashik Crime Police officer assaulted news)

जितेंद्र निंबा पाटील (२९, रा. सत्यम रो हाऊस, आडगाव शिवार) असे आरोपीचे नाव आहे. ७ मार्च २०२७ रोजी रात्री बाराच्या सुमारास आरोपी पाटील हा आडगाव पोलिस ठाण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील हे कर्तव्यावर असताना त्यांच्यासह अंमलदारांना शिवीगाळ करीत मारहाण केली होती. याप्रकरणी आडगाव पोलिसात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  (latest marathi news)

सदर गुन्ह्याचा तपास तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक ए.पी. महिरे यांनी केला आणि जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश एम.आय. लोकवाणी यांच्यासमोर खटल्याचे काम झाले. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता श्रीमती अपर्णा पाटील यांनी कामकाज पाहताना साक्षीदार तपासले.

आरोपीविरोधातील पुरावे सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीला सहा महिने साधा कारावास व ६ हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून महिला अंमलदार प्रेरणा अंबादे, हवालदार सोमनाथ शिंदे, महिला हवालदार एस.टी. बहिरम यांनी पाठपुरावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्माचे शतक! शुभमन गिलसोबत विक्रमी भागीदारी; गांगुली-तेंडुलकर यांचा १९९८ चा विक्रम संकटात...

Satara DJ Rules: सण-उत्सवात डीजेचा आवाज वाढवला तर खिसा रिकामा! व्यक्तीला ५० हजार, मंडळांना १ लाखांची अनामत

SCROLL FOR NEXT