crime esakal
नाशिक

Nashik Crime News : अवैध मद्य अड्ड्यांवर पोलिसांच्या धाडी; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धडक कारवाई

Nashik Crime : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाईचा बडगा उगारला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. पंचवटी, अंबड आणि सातपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैधरीत्या सुरू असलेल्या दारू अड्ड्यांवर धाडी टाकून ते उद्ध्वस्त करीत, सुमारे सात हजारांचा देशी दारूचा साठा जप्त केला आहे. येत्या काळात अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा बडगा आणखी वाढणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. (Nashik Crime Police raid on illegal liquor dens marathi News )

पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फुले नगरमधील कालिका नगरमध्ये चोरी-छुपे सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्री अड्ड्यावर सोमवारी (ता.१८) सायंकाळी पाचच्या सुमारास छापा टाकला. यावेळी संशयित विजय आचारी (२४, रा. कालिका नगर, पेठ रोड) यास अटक करून त्याच्याकडून १ हजार ९६० रुपयांचा अवैध देशी मद्यसाठा व १ हजार रुपये रोख असा २ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सातपूर हद्दीतील कुबेर स्वामी पेट्रोल पंपामागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अवैध देशी दारूची विक्री केली जात होती. सातपूर पोलिसांनी रवींद्र सूर्यवंशी (४८, रा. सातपूर, मूळ रा. ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून ३ हजार ३६० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.

सातपूर पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर चुंचाळे शिवारातील पत्र्याच्या शेडमध्ये अवैध देशी दारू विक्री करताना संशयित देविदास आरने (७६, रा. घरकुल चुंचाळे योजना, अंबड) यास पकडले. संशयिताकडून १ हजार १९० रुपयांचा देशी मद्यसाठा जप्त केला असून, याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT