nashik Central Jail esakal
नाशिक

Nashik Crime : बलात्कारी मौलवीची रवानगी मध्यवर्ती कारागृहात! पोलिसांचे पीडितांना तक्रारी करण्याचे आवाहन

Crime News : संशयिताने विवाहितेवर अत्याचार केला. ही बाब पीडितेस समजल्यानंतर तिने इंदिरानगर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित शेख यास अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : वडाळागावात पोटदुखीच्या उपचारासाठी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या मौलवीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. (Rapist maulavi sent to Central Jail)

हुसन यासीम शेख (३२, रा. मेहमूद नगर, वडाळागाव) असे संशयित मौलवीचे नाव आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पीडित नवविवाहितेचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. तिला पोटदुखीचा त्रास असल्याने तिच्यावर डॉक्टरांकडे उपचार केले.

मात्र, उपचारानंतरही आराम न मिळाल्याने तिची सासू व नणंद आणि पतीने विवाहितेस वडाळागावातील संशयित हुसन शेख या मौलवीकडे नेले. हुसन हा परिसरात हकिम म्हणून वावरत होता. आयुर्वेदिक उपचार करत असल्याचे तो भासवत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पीडितेस त्याच्याकडे नेल्यानंतर त्याने उपचार करण्याच्या बहाण्याने पैशांची मागणी केली. तसेच २६ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता पीडिता तिच्या नातलगांसोबत हकिमाकडे उपचारासाठी गेली असता त्याने नातलगांना बाहेर बसवले. (latest marathi news)

पीडितेस घरात नेत तिला पावडरसदृश भूगा खाण्यास देत तिच्या चेहऱ्यावर गुंगीकारक पावडरची फुंकर मारली. त्यामुळे पीडितेची शुद्ध हरपली. यानंतर संशयिताने विवाहितेवर अत्याचार केला. ही बाब पीडितेस समजल्यानंतर तिने इंदिरानगर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित शेख यास अटक केली.

पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यास पुन्हा न्यायालयात हजर केले असता, त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली आहे. दरम्यान, संशयित मौलवीने उपचाराच्या नावाखाली आणखीही काही महिलांवर अत्याचार केला असण्याची शक्यता आहे. त्यासाठी पीडितांनी पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन इंदिरानगर पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारी कार्यालयांत आता बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य! GNCTD आणि MCD मध्ये मोठा बदल; दिल्ली सरकारचा महत्त्वाचा निर्णय

KKR vs LSG Live: OUT or NOT OUT? अम्पायरला घाई, रिप्ले न पाहताच Finn Allen ला दिले बाद, त्या झेलवरून सुरू झालाय वाद; Video

Tahsildar Rakesh Gidde Death : कष्टाने ‘तहसिलदार’ झाला पण, अर्ध्यावर डाव मोडला! राकेश गिड्डे यांच्या निधनाने सांगलीकर भावूक

Maharashtra 11th admission online: इयत्ता अकरावी प्रवेशासाठी राज्यभर ऑनलाइन नोंदणीला शुक्रवारपासून प्रारंभ; दहावीचा निकाल लागल्यानंतर अर्जाचा दुसरा भाग उपलब्ध

Parth Pawar look ajit pawar : पार्थ पवारांनी खासदारकीची शपथ घेतली पण, त्यांचा लूक पाहिला का? अजित दादांची येईल आठवण

SCROLL FOR NEXT