Tempo and suspect who brought cattle for slaughter at Bagwanpura in Bhadrakali, Nashik. A squad of unit one esakal
नाशिक

Nashik Crime News : कत्तलीसाठी आणलेल्या गायींची सुटका! गुन्हेशाखा युनिट एकची कारवाई; एकाला अटक

Crime News : भद्रकालीतील बागवान पुऱ्यात कत्तलीसाठी गायी आणल्या असता, दबा धरून असलेल्या शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने एकाला अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भद्रकालीतील बागवान पुऱ्यात कत्तलीसाठी गायी आणल्या असता, दबा धरून असलेल्या शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने एकाला अटक केली. तसेच कत्तलीच्या उद्देशाने आणलेल्या तीन गायीची सुटका केली. वाहनांसह सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. (Nashik Crime Rescue of cows One arrested marathi news)

सद्दाम अन्वर पाटकरी (३३, रा. जोगवाडा, मुलतानपुरा, भद्रकाली) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे अंमलदार रमेश कोळी यांना बागवान पुऱ्यातील बिरबल आखाड्यात जिवंत गोवंशीय जनावरांना कत्तलीसाठी आणण्यात येणार असल्याची खबर मिळाली होती. यासंदर्भातील माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देण्यात आली. त्यानुसार, बुधवारी (ता. २०) पहाटेच्या सुमारास बागवानपुर्यात सापळा रचण्यात आला होता.

पहाटेच्या सुमारास बागवानपुर्यात टाटा कंपनीचा छोटा हत्तीतून (एमएच १५ सीके ९५६२) संशयित सद्दाम पाटकरी हा दोन जिवंत गायी कत्तलीच्या उद्देशाने घेऊन आला. त्यावेळी दबा धरून असलेल्या पथकाने त्यास ताब्यात घेत टेम्पोसह गायी जप्त केल्या. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (latest marathi news)

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपनिरीक्षक गजानन इंगळे, रमेश कोळी, देविदास ठाकरे, योगीराज गायकवाड, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, राजेश राठोड, समाधान पवार, गांगुर्डे, सोनवणे यांनी बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: ''कितीही दबाव आला तरी आम्ही सहन करू'', 'ट्रम्प टॅरिफ'वरुन मोदी स्पष्ट बोलले

AI Use in Ganeshotsav Crowd गणेशोत्‍सवातील गर्दीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी ‘एआय’चा वापर

ED Action: धर्मांतर टोळीचा मास्टरमाइंड चांगूर बाबाला 'मनी लाँड्रिंग' प्रकरणात ‘ED’चा दणका!

सरकारचा आदेश निघाला! ५२ हजार २७६ शिक्षकांसाठी मोठा निर्णय, अशंत: अनुदानावरील शाळांना २० टक्के वाढीव टप्पा अनुदान मंजूर, १ ऑगस्टपासून मिळणार अनुदान

Latest Marathi News Updates: निफाड साखर कारखान्याला पिंपळस ग्रामपालिकेडून सील

SCROLL FOR NEXT