Nashik Crime News  esakal
नाशिक

Nashik Crime News : रिक्षाचालकाला तलवारीने मारून केली लुटमार; नाशिकरोड परिसरात वाढत्या गुंडागर्दीचे आव्हान

Nashik News : नाशिकरोड येथील गुलजार वाडीत रिक्षाचालकाला त्याच्या ओळखीतील संशयितांनी गळ्यातील सोन्याची चैन व रोकड काढून घेत तलवारीने डोक्यात मारून जखमी केल्याचा प्रकार बुधवारी पहाटे घडला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिकरोड येथील गुलजार वाडीत रिक्षाचालकाला त्याच्या ओळखीतील संशयितांनी गळ्यातील सोन्याची चैन व रोकड काढून घेत तलवारीने डोक्यात मारून जखमी केल्याचा प्रकार बुधवारी (ता. २६) पहाटे घडला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, उपनगर, देवळाली कॅम्प परिसरामध्येही गुंडागर्दी वाढली असून लोखंडी रॉड. (Rickshaw puller beaten and robbed with sword)

चॉपर, कोयत्याचा वापर हाणामारीच्या घटनांमध्ये गेल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. विकास अरुण दोंदे (रा. समता नगर, आगार टाकळी, उपनगर) या रिक्षाचालकाच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता. २६) पहाटे दोन वाजेच्या सुमारास सुभाष रोडवरील गुलजार वाडी येथे संशयित आदिल उर्फ शाहरुख (रा. बागुलनगर, विहितगाव) व त्याचे तीन साथीदारांनी विकास यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व खिशातील रोकड बळजबरीने काढून घेत असताना त्याने विरोध केला.

त्यावेळी संशयित आदिल याने त्याच्या रिक्षाच्या सीटखाली ठेवलेली तलवार काढून विकासच्या डोक्यात मारली. त्यानंतर दुसर्या संशयितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर चौघांनी सोन्याची चैन व रोकड घेऊन रिक्षातून पसार झाले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक सुनील बिडकर हे तपास करीत आहेत.

याचप्रमाणे, देवळाली कॅम्प येथील हाडोळ्यात संशयितांनी एकाला कोयता, चॉपरने मारून गंभीर जखमी केले आहे. हर्ष किशोर बाबू (रा. नाशिकरोड) याच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता. २५) रात्री साडेदहाच्या सुमारास तो मित्र अभिषेक केदारे, संकेत काळे, प्रणव बागुल याच्यासह दोन दुचाक्यावरून जात असताना हाडोळा येथे संशयित साहिल वायदंडे. (latest marathi news)

इंदल वायदंडे, गणेश वायदंडे, चेतन वायदंडे (सर्व रा. देवळाली कॅम्प) यांनी भांडणाची कुरापत काढून हर्ष यास कोयता, चॉपर, लाकडी दांड्याने मारून जखमी केले. तसेच, दुचाकीचेही नुकसान केले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवळाली कॅम्प येथे कुरापत काढून तिघांनी एकाला बेदम मारहाण केली. फैजान खान (२६), पापिया पठाण (२८), सिद्धार्थ लोखंडे असे संशयितांची नावे आहेत. चेतन नागराज वाघमारे (२८, रा. देवळाली कॅम्प) याच्या फिर्यादीनुसार, तो मंगळवारी (ता. २५) सायंकाळी पाच वाजता गरीब नवाज बिल्डिंगमधील रेशन दुकानात रेशन घेण्यासाठी आला असता.

संशयित फैजान याने त्यास तू बिटू पवारसोबत का राहतो अशी कुरापत काढून त्यास शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यावेळी संशयित पठाण व सिद्धार्थ हेही धावून आले. पठाण याने त्याच्याकडील लोखंडी रॉडने मारहाण केली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT