Police team conducting Panchnama at Hotel Shahi Plaza. In the second photo, the team checking fingerprints. esakal
नाशिक

Nashik Crime News : इगतपुरीत हॉटेल शाही प्लाझावर दरोडा

Nashik Crime : हॉटेल शाही प्लाझा येथे मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरी झाल्याची घटना शनिवार (ता. २४ रोजी) पहाटे घडली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : नाशिक- मुंबई महामार्गावरील तळेगाव शिवारातील चिवॉज वाइन शॉपमध्ये पावणेतीन लाखाची जबरी चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच हॉटेल शाही प्लाझा येथे मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी चोरी झाल्याची घटना शनिवार (ता. २४ रोजी) पहाटे घडली. या घटनेमुळे महामार्गावर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. (Nashik Crime Robbery at Hotel Shahi Plaza in Igatpuri marathi news)

शहरातील हॉटेल शाही प्लाझाच्या किचनची खिडकी तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश करत एक लाख पाच हजार रुपये रोख व जवळपास एक लाख रुपयांच्या महागड्या स्कॉचच्या मोठ्या मद्याच्या बाटल्या असा जवळपास दोन लाखांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी चोरी करताना चोरट्यांनी सीसीटीव्हीच्या वायरी तोडून डिव्हीआरच चोरुन नेला आहे.

चोरीची घटना कळताच पोलिस निरीक्षक राहुल तसरे यांनी भेट पंचनामा केला. त्यानंतर श्वान पथक व फिंगर प्रिंट तज्ज्ञांचे पथक यांनी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक राहुल तसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कांचन भोजने, संदीप शिंदे, नीलेश देवराज, अभिजीत पोटिंदे, योगेश भावनाथ, मनोज पवार, प्रदीप घेगडमल, रविंद्र कचरे आदी करत आहे.

गस्त वाढविण्याची मागणी

शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात एका निवृत्त शिक्षकाला पोलिस असल्याचे भासवीत दोन जणांनी एक लाख रुपयाला गंडा घातला होता. सतत घडणाऱ्या चोरीच्या घटनेमुळे चोरट्यांनी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.सतत होणाऱ्या चोऱ्यांच्या या घटनेमुळे व्यावसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्री पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT