Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : ACB च्या नावाखाली अज्ञातांकडून लुट! चांडक सर्कल येथील मध्यरात्रीचा प्रकार

Crime News : संशयितांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी ते टाळत अरेरावी सुरूच ठेवली. त्यावेळी अडवणूक केलेल्या व्यक्तीच्या वरिष्ठांनी, तिथेच थांबा मी तिकडे येतो, असे म्हटल्यावर संशयितांनी फोन कट करून परत दिला आणि पोबारा केला.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : सोमवारी (ता. १५) पहाटे साडेतीन-चार वाजेच्या सुमारास चांडक सर्कल याठिकाणी दुचाकीवरून दोघा भामट्यांनी ‘ॲण्टी करप्शन’चे कर्मचारी असल्याची बतावणी करीत या रस्त्याने जाणाऱ्या वाहनांची लुटमार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Robbery by unknown persons in name of ACB at Chandak Circle)

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित चालक हे त्यांच्या चारचाकी वाहनाने चांडक सर्कल मार्गे द्वारकेच्या दिशेने जात होते. त्यावेळी चांडक सर्कल येथे दुचाकीवरून असलेल्या दोघांनी त्यांचे वाहन अडविले आणि स्वत:ला ॲण्टी करप्शन विभागाचे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) कर्मचारी असल्याचे सांगत त्यांनी वाहनाची झडती घेण्यास सुरवात करीत त्यांच्याशी अरेरावी करीत अडवणूक करू लागले.

त्यावेळी संबंधितांने त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधला असला त्यांच्याशी संशयित अरेरावीने बोलत होते. संशयितांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी ते टाळत अरेरावी सुरूच ठेवली. त्यावेळी संबंधित व्यक्तीच्या वरिष्ठांनी, तिथेच थांबा मी तिकडे येतो, असे म्हटल्यावर संशयितांनी फोन कट करून परत दिला आणि पोबारा केला. (latest marathi news)

परंतु संशयितांनी या रस्त्यावर अशाप्रकारचे कृत्य केल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसून येत असल्याचे संबंधितांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकाराशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट करताना यासंदर्भात शहर पोलिसांना चौकशी करण्याबाबत सांगण्यात येईल असेही स्पष्ट केले.

"असा प्रकार घडत असेल तर गंभीर बाब आहे. या परिसरातील सीसीटीव्ही तपासून संशयित नेमके कोण होते, याचा शोध घेऊ."

- किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT