Bribe Crime esakal
नाशिक

Nashik Bribe Crime News : स्वतंत्र रेशनकार्ड करण्यासाठी सेतू कर्मचाऱ्यास लाच घेताना अटक

Crime News : सीताराम बनश्या पवार (३५, रा. रानविहिर, पो. सतखांब, ता. सुरगाणा , नाशिक) असे लाचखोरांचे नाव आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime News : तक्रारदाराच्या पत्नी व मुलांचे स्वतंत्र रेशनकार्ड करण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना सुरगाणा येथील सेतू कर्मचाऱ्यांस अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सदरची कारवाई गुरुवारी (ता. 20) केली. (Setu employee arrested for taking bribe)

सीताराम बनश्या पवार (३५, रा. रानविहिर, पो. सतखांब, ता. सुरगाणा , नाशिक) असे लाचखोरांचे नाव आहे. तक्रारदार यांच्या पत्नीचे व मुलांचे स्वतंत्र वेगळे रेशनकार्ड तयार करण्याकरिता 5 जून रोजी 2 हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

याची पडताळणी विभागाने केल्यानंतर आज सुरगाणा येथील सेतू कार्यालयात सापळा रचण्यात आला. गुरुवारी लाचखोर पवार याने पंच, साक्षीदारासमक्ष तहसिल कार्यालय,सुरगाणा येथील सेतू कार्यालयात 2 हजारांची लाच स्वीकारली असता त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. (latest marathi news)

या प्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस उपअधीक्षक वैशाली पाटील, शरद हेंबाडे, प्रफुल्ल माळी, संतोष गांगुर्डे, परशुराम जाधव, विलास निकम, अविनाश पवार यांनी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT