Crime esakal
नाशिक

Nashik Crime News : डोकेदुखीच्‍या उपचारासाठी आलेली सतरावर्षीय अल्‍पवयीन निघाली गरोदर

Nashik News : डोकेदुखीचा व श्‍वास घेण्यास त्रास होत असल्‍याच्‍या तक्रारीवरून सातपूरच्‍या कामगार रुग्‍णालयात दाखल १७ वर्षीय अल्‍पवयीन मुलगी गरोदर असल्‍याचे वैद्यकीय तपासण्यांतून समोर आले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : डोकेदुखीचा व श्‍वास घेण्यास त्रास होत असल्‍याच्‍या तक्रारीवरून सातपूरच्‍या कामगार रुग्‍णालयात दाखल १७ वर्षीय अल्‍पवयीन मुलगी गरोदर असल्‍याचे वैद्यकीय तपासण्यांतून समोर आले. दरम्‍यान, संबंधित मुलीचे समुपदेशन करत तिच्‍यावर कुणी अत्‍याचार केला का, याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्‍न केला असता, घाबरलेल्‍या पीडितेने कुठलीही माहिती दिली नाही. (seventeen year old minor who came for headache treatment turned out to be pregnant)

त्‍यामुळे अज्ञात व्‍यक्‍तीविरोधात अत्‍याचाराचा गुन्‍हा दाखल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. गेल्‍या २९ एप्रिलला मुलीच्‍या आईने तिला कामगार रुग्‍णालयात दाखल केले होते. तेव्‍हा मुलीला श्‍वास घेण्यास त्रास होत होता व डोके दुखत होते. उपचार घेऊन दोन-तीन दिवसांनंतरही त्रास थांबला नाही.

त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. २) गरोदरपणाची चाचणी केली असता, त्यामध्ये अल्‍पवयीन मुलगी गरोदर असल्‍याचे निदर्शनास आले. मुलीच्‍या आईने तिला विश्‍वासात घेऊन लैंगिक अत्‍याचार कुणी केले, याबाबत विचारपूस केली.

परंतु मुलगी घाबरलेली असल्‍याने तिने कुठलीच माहिती दिली नाही. त्यानंतर शुक्रवारी (ता. ३) महिला बालकल्‍याण समितीच्‍या समुपदेशक ज्‍योती पठाडे व पूजा देपे यांनीदेखील विश्‍वासात घेत अत्‍याचाराबाबत विचारपूस केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचिता शिंदे यांनीही तिच्‍याशी संवाद साधत घटनेबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्‍न केला.

परंतु तिने कुणालाच याबाबत माहिती सांगितली नाही. संबंधित मुलगी अल्‍पवयीन असल्‍याचा फायदा घेत तिच्‍यावर अत्‍याचार केल्‍याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अज्ञात व्‍यक्‍तीविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

SCROLL FOR NEXT