Sharad Pawar & Kondaji Mama Avhad esakal
नाशिक

Nashik Crime News: शरद पवार यांच्या सभेत 'हात की सफाई'! अज्ञाताने जिल्हाध्यक्षांच्याच गळ्यातील सोन्याची साखळी लांबवली

Crime News : शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांची सहा तोळ्याची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना घडली असून वणी पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

वणी : दिंडोरी लोकसभा मतदार संघात वणी येथे बुधवारी, ता. १५ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झालेल्या प्रचारसभेतून राष्ट्रवादी कॉंग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांची सहा तोळ्याची सोनसाखळी "हात की सफाई" करीत अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना घडली असून वणी पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime Sharad Pawar sabha stolen gold chain news)

महाविकास आघाडी राष्ट्रवादी कॉंग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहिर सभा बुधवारी, ता. १५ रोजी सायंकाळी सहा ते नऊ वाजेच्या दरम्यान संपन्न झाली. यासभेसाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आ. अनिल देशमुख, आ. रोहीत पवार, आ. सुनिल भुसारा यांच्यासह जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. (latest marathi news)

सभेसाठी दिंडोरीसह लगतच्या सुरगाणा, कळवण, चांदवड, निफाड तालुक्यातून दहा हजारावर नागरिक आले होते. रात्री नऊ वाजेच्या सुमारास शरद पवार यांचे भाषण संपल्यानंतर कोडांजी रावबा आव्हाड, वय 72 वर्षे (राष्ट्रवादी कॉग्रेज नाशिक जिल्हा अध्यक्ष ) रा. प्लॉट नं. 57 पुष्कर बिल्डीग रामदास गार्डन समोर कॅनडा कॉर्नर नाशिक हे व्यासपिठावरुन उतरुन मैदानाबाहेर पडतांना असलेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने कोंडाजी आव्हाड यांच्या गळ्यातील गळ्यातील ६ तोळे वजनाची सोन्याची चैन त्यामध्ये ओम पानचे पॅन्डल असे सुमारे तीन लाख रूपायांंची सोन्याची चैन चोरुन नेली आहे. याबाबत रात्री उशिरा वणी पोलिसांत कोंडाजी आव्हाड यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: ट्रम्पच्या धमकीनंतर सोन्याचे भाव कोसळले! मार्च महिन्यात सोनं तब्बल 35 हजारांनी स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

CM Devendra Fadnavis : 'भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी कोणालाही सोडणार नाही'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडक इशारा, रूपाली चाकणकरांबाबत काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : सातारा जिल्हा परिषद निवडणूक मुद्द्यावर मंत्री शंभुराज देसाई आक्रमक

Panchang 23 March 2026: आजच्या दिवशी शिव कवच स्तोत्राचे पठण आणि ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

5 वर्षांनी स्वामींच्या भूमिकेला दिला निरोप! अक्षयची 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतून एक्झिट, 'हे' ज्येष्ठ अभिनेते साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT