Nashik Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : पैशाच्या वादातून 5 जण जखमी!

Nashik News : हातउसनवार घेतलेल्या पैशाच्या वादातून दोन मित्रांमध्ये वादावादी झाली. त्यात पाच जण गंभीर जखमी झाले असून, एकाच्या मांडीला बंदुकीची गोळी लागली, तर एकाच्या पायाला गोळी चाटून गेली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : हातउसनवार घेतलेल्या पैशाच्या वादातून दोन मित्रांमध्ये वादावादी झाली. त्यात पाच जण गंभीर जखमी झाले असून, एकाच्या मांडीला बंदुकीची गोळी लागली, तर एकाच्या पायाला गोळी चाटून गेली. नाशिक रोड येथे राहणारा गणेश जमधडे व स्वप्नील हांडोरे हे दोघे जण मित्र होते. (Nashik Crime News)

स्वप्नील हांडोरे याने एक ते दीड वर्षापूर्वी गणेश जमधडे याच्याकडून दीड लाख रुपये हातउसने घेतले होते. दोघे मित्र असल्याने जमधडे याने पैसे मिळतील या आशेने त्याने त्याकडे थोडे दुर्लक्ष केले; मात्र मुदत संपूनही स्वप्नील हांडोरे हा हातउसनवार घेतलेले पैसे देत नव्हता. याच आर्थिक वादातून ५ सहा महिन्यांच्यापासून दोघांच्या मैत्रीचे रुपांतर दुश्मनित झाले.

गणेश जमधडे याने पैसे वसुलीसाठी स्वप्नीलकडे तगादा लावला; त्याने प्रतिसाद दिला नाही. त्याला राग अनावर झाला. काल रात्री स्वप्नील हांडोरे, त्याचा भाऊ दर्शन हांडोरे व विकी हांडोरे हे तिघे जण विहितगावातील मथुरा चौकात बसलेले होते. याबाबतचा सुगावा गणेश जमधडे याला लागला. त्यानंतर त्याने आपले मित्र प्रतिक वाकचौरे.

आकाश पवार, सौरभ लोंढे यांना सोबत घेऊन मथुरा चौकात येऊन हांडोरे बंधूंवर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यानंतर गणेशने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तरादाखल हांडोरे बंधूंनीही त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गणेश जमधडे सोबत आलेल्या आकाश पवारच्या मांडीला बंदुकीतून झाडण्यात आलेली गोळी लागली. (latest marathi news)

तर स्वप्नील हांडोरेच्या पायालाही बंदुकीची गोळी चाटून गेली. यावेळी परिसरात दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणात गदारोळ घालून आरडाओरडा करण्यात आल्याने मथुरा चौकातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या दोन गटामध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये ५ जण गंभीर जखमी झाले असून, त्यातील दोघा जणांवर खासगी रुग्णालयात, तर एका जणावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही गटांतील गणेश जमधडे व विकी हांडोरे यांना ताब्यात घेतले आहे.

तर रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या आरोपींना वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात येणार आहे. याप्रकरणी बंदुकीतील मारलेली गोळी कोणी झाडली. याचा तपास पोलिसांनी सुरू केला असून, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी इतर संशयितांचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT