Stock of foreign liquor was seized from the same bus belonging to Gujarat Corporation.
Stock of foreign liquor was seized from the same bus belonging to Gujarat Corporation. esakal
नाशिक

Nashik Crime News : गुजरात महामंडळाच्या एसटीतून मद्याची तस्करी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : गुजरात परिवहन महामंडळाच्या बसमधून मद्याची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले आहे. नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने बसमधून १ लाख १४ हजार ६३५ रुपयांचा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. नाशिक-सुरत महामार्गावरील दिंडोरी परिसरात ही कारवाई करण्यात आली असून बसचालक व वाहकाविरोधात दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. (Nashik Crime Smuggling of liquor through ST Bus of Gujarat Corporation)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमांवर नाकाबंदी केली असून, आंतरराज्य सीमावर्ती भागातही चेकपोस्ट सुरु केले आहेत. नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांना मद्य तस्करीची खबर मिळाली होती.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (ता.१८) दिंडोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून बसची तपासणी केली. त्यावेळी बसमध्ये विदेशी मद्यसाठा आढळला. (latest marathi news)

याप्रकरणी बसचालक विजय बलसार (५२) व वाहक अमृत पटेल (५६, दोघे रा. सुरत) यांच्यासह पंचवटीतील मद्यविक्री करणाऱ्या चालक, मालकाविरोधात दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सुरत येथून अज्ञात व्यक्तीने पंचवटीतील किस्मत ब्रँडी शॉप येथून मद्याची खरेदी केली होती. त्यामुळे पोलिसांनी किस्मत शॉपच्या मालक, चालकाविरोधातही कारवाई केली आहे. संशयितांनी यापूर्वीही अशाप्रकारे मद्यसाठा सुरतला नेला का, याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT