Stone pelting by mob at Bharat Nagar substation esakal
नाशिक

Nashik Crime News : भारतनगर सबस्टेशनवर जमावाकडून दगडफेक

Nashik News : भारतनगर-शिवाजीवाडी येथील वीज कंपनीच्या सबस्टेशनवर वीजपुरवठा खंडित झाल्याने बुधवारी (ता. २२) रात्री साडेदहाच्या सुमारास संतप्त जमावाने दगडफेक करत रोष व्यक्त केला.

सकाळ वृत्तसेवा

इंदिरानगर : भारतनगर-शिवाजीवाडी येथील वीज कंपनीच्या सबस्टेशनवर वीजपुरवठा खंडित झाल्याने बुधवारी (ता. २२) रात्री साडेदहाच्या सुमारास संतप्त जमावाने दगडफेक करत रोष व्यक्त केला. दगडफेकीनंतर कर्मचारी शेखर कापडणीस आणि रखवालदाराला धक्काबुक्की करण्यात आली. (Stone pelting by mob at Bharat Nagar substation)

गेल्या दहा दिवसांपासून प्रचंड उकाडा वाढत असून, इंदिरानगर भागातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. गत आठवड्यात तर सलग तीन दिवस सरासरी आठ ते दहा तास वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक संतप्त झाले होते. त्यानंतर दोन दिवस सुरळीत वीजपुरवठा झाला.

बुधवारी रात्री पुन्हा ३३ केव्ही मुख्य वाहिनीमध्ये हॉटेल कावेरीजवळ बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. तातडीने कामदेखील सुरू करण्यात आले. पर्याय म्हणून इंदिरानगर, हॉटेल एक्स्प्रेस इन, अंबड आदी ठिकाणच्या सबस्टेशनवरून पर्यायी वीज उपलब्ध करून काही ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. (latest marathi news)

संतप्त झालेल्या नागरिकांनी अचानक या सबस्टेशनवर दगडफेक केली. येथील सर्व कर्मचारी आणि अधिकारी केबल नादुरुस्त झालेल्या ठिकाणी कामासाठी गेले होते. या वेळी कापडणीस रखवालदारासोबत तेथे होते. अचानक झालेल्या या प्रकाराने तेदेखील भयभीत झाले. जमावाने अंधाराचा फायदा घेऊन त्यांनादेखील मारहाण केल्याचे वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

पुरेशी क्षमता नसताना सर्रास नवीन वीजजोडणी देत असल्याने वारंवार या वाहिन्यांवर अतिरिक्त दबाव येऊन वीजपुरवठा खंडित होतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे. वीज कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोचला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

Ketu Nakshatra Gochar: केतू मघा नक्षत्र परिवर्तनात करेल प्रवेश , जाणून घ्या कोणत्या राशींच्या वाढणार समस्या

Latest Marathi News Live Update : आखाती देशांमधील युद्धाची झळ थेट बळीराजाच्या खिशाला

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

SCROLL FOR NEXT