The police ran away while dispersing the crowd esakal
नाशिक

Nashik Crime News : जुगाराच्या आर्थिक देवाणघेवाणीतून वडाळा नाका परिसरात दगडफेक

Nashik Crime : वडाळा नाका परिसरात आर्थिक देवाणघेवाणीतून जुगार खेळणाऱ्यांसह अड्डा चालकाचा वाद होऊन मारहाण झाली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : वडाळा नाका परिसरात आर्थिक देवाणघेवाणीतून जुगार खेळणाऱ्यांसह अड्डा चालकाचा वाद होऊन मारहाण झाली. परिसरात जमलेल्या जमावाकडून जुगारअड्ड्यावर आणि परिसरात दगडफेक करण्यात आली. मारहाणीत एका महिलेसह दोन जण जखमी झाले आहे. जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वडाळा नाका चौकातील एका हॉटेलशेजारील एका गाळ्यात जुगारअड्डा सुरू होता. (Stone pelting in Wadala Naka area due to financial exchange of gambling )

जुगाऱ्याच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून जुगार खेळणाऱ्यासह जुगार अड्डाचालक यांच्यात वाद झाला. चालकाने दोघांना मारहाण केली. परिसरात मोठा जमाव जमला होता. वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले. जमावाने जुगारअड्ड्यासह परिसरात दगडफेक केली. मारहाण आणि दगडफेकीत एका महिलेसह दोन जण जखमी झाले. सरदिल शेख (रा. भारतनगर), जावेद पठाण (रा. गजमाळ) तसेच एक महिला असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.

मुंबई नाका पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. जमलेला जमाव पांगविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्या वेळी सर्वांची धावपळ उडाली. पोलिस ठाण्यात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिस वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने मोठी दुर्घटना टळली. अवैध धंद्याचा सुळसुळाट वाढल्याने सतत अशा घटना घडत आहे.

काही दिवसांपूर्वी भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीतील बागवानपुरा परिसरातही अशीच घटना घडली होती. त्या ठिकाणी तर चक्क गावठी कट्टे बाहेर निघाले होते. परिसरात झालेल्या दगडफेकीत एक चिमुकली जखमीदेखील झाली होती. पोलिस विभागाच्या दुर्लक्षाने सर्रास ठिकठिकाणी जुगार अड्डे सुरू असल्याने अशा घटना घडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT