cheque bounce esakal
नाशिक

Nashik Crime News : धनादेश न वटल्याने संशयितास 2 वर्ष कारावास अन 10 लाखाचा दंड

Crime News : अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी तेजवंतसिंग संधू यांनी हा निकाल दिला.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : हातउसनवार घेतलेल्या पैशांपोटी दिलेला धनादेश न वटल्यामुळे धनादेश देऊन फसवणूक करणाऱ्या संशयितास येथील न्यायालयाने दोन वर्ष कारावास, दहा लाख रुपये दंड, ९ टक्के व्याजासह अदा करण्याचा आदेश दिला. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी तेजवंतसिंग संधू यांनी हा निकाल दिला. (Nashik Crime Suspect gets 2 years imprisonment and 10 lakh fine for bouncing of cheque marathi news)

तिसगाव (ता. देवळा) येथील त्र्यंबक वाघ यांनी सौंदाणे (ता. मालेगाव) येथील किरण पवार यांच्याकडुन पाच लाख रुपये हातउसनवार म्हणून घेतले होते. श्री. पवार यांनी काही कालावधीनंतर या रक्कमेची मागणी केली. रक्कम परतफेडीसाठी श्री. वाघ यांनी त्यांच्या कोटक महिंद्रा बँक शाखा मुंगसे (ता. मालेगाव) या बँकेचा धनादेश (क्रमांक ००००३१) ४ फेब्रुवारी २०२२ या तारखेचा दिला.

श्री. पवार यांनी धनादेश वटविण्यासाठी बँकेत भरला असता बँकेत पुरेशी रक्कम शिल्लक नसल्यामुळे धनादेश वटला नाही. त्याविरोधात श्री. पवार यांनी न्यायालयात दावा दाखल केला. न्यायाधीश संधू यांच्या न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालले.

श्री. पवार यांच्यातर्फे ॲड. एस. बी. इंगळे यांनी बाजू मांडली. श्री. पवार यांची साक्ष नोंदविण्यात आली. या व्यवहारातील धनादेश, बाऊंस मेमो, नोटीस आदी मुळ कागदपत्रांमुळे न्यायालयासमोर गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने दहा लाख रुपये दंड, ९ टक्के व्याजासह अदा करतांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silver Price Today : अरे बापरे! चांदीचा भाव 2 लाखांवर; वर्षात दिला तब्बल 121% रिटर्न! भाव आजून वाढणार का?

INDU19 vs UAEU19 : भारताचा २३४ धावांनी दणदणीत विजय, वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी १७१ धावा; आता पाकिस्तानला रविवारी भिडणार

Mumbai Police: पोलिसांसाठी सुखद वार्ता! ५३८ चौरस फूट सरकारी घरे मंजूर; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, कुणाला फायदा होणार?

Shashi Tharoor absence from Rahul Gandhi meeting : राहुल गांधींच्या बैठकीला शशी थरूर सलग तिसऱ्यांदा गैरहजर ; चर्चांना उधाण!

Cabinet Decision: जनगणनेसाठी मोठं बजेट मंजूर; ऊर्जा सुधारणा आणि कृषी क्षेत्रात बदल अन्..., केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT