Nashik Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News : खूनप्रकरणी संशयितांचा लागेना सुगावा!

Nashik News : गंजमाळ पंचशील नगर येथील तडीपार संशयित पांडुरंग शिंगाडे याचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता.५) रोजी घडली होती.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गंजमाळ पंचशील नगर येथील तडीपार संशयित पांडुरंग शिंगाडे याचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता.५) रोजी घडली होती. त्याचे मारेकरी अद्याप फरार असून भद्रकली गुन्हे शोध पथकासह शहर गुन्हे शाखेचे विविध पथक त्यांच्या मागावर आहे. (Suspects missing in murder case)

मयत पांडुरंग शिंगाडे काकाच्या दशक्रिया विधीसाठी शहरात आला होता. शुक्रवारी (ता.५) पहाटे साडेतीनला तिघां संशयितांनी शिंगाडे याच्या घरात शिरून त्याच्यावर धारधार शस्त्राने वार करत त्याचा खून केला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित कैलास गायकवाड, निखिल सच्चे आणि अन्य एका संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी संशयितांच्या शोधात पथक रवाना केले. त्यांना अद्याप यश आलेले नाही. भद्रकली गुन्हे शोध पथकासह पोलिस आयुक्तालयातील शहर गुन्हे शाखेचे विविध पथक त्यांच्या शोधात रवाना झाले आहे. (latest marathi news)

पोलिसांनी संशयितांच्या काढलेल्या माहितीनुसार मुख्य संशयित कैलास गायकवाड यांच्याविरुद्ध आडगाव पोलिस ठाण्यात तीन तर मुंबई नाका पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

निखिल सच्चे ही सराईत गुन्हेगार असून दोघे संशयित ताब्यात आल्यानंतर अन्य संशयितांची नावे आणि माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! 20 दिवसांत सोनं 35 हजारांनी कोसळलं; चांदी 1.85 लाखांनी घसरली, पाहा आजचे ताजे भाव

Jitendra Dudi: भीमाशंकर गावठाणाचे होणार स्थलांतर: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ग्रामस्थांची अटीशर्तीवर मान्यता!

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची आज 'देवगिरी'वर बैठक

Chicken bird flu: सावधान! शासकीय अंडी उबवणी केंद्रामध्ये 'बर्ड फ्लू'चा शिरकाव; १००० कोंबड्यांचा मृत्यू

Ashok Kharat Case : खरातचे कारनामे संपेनात ! आधी पीडित महिलांची अब्रू लुटायचा अन् मग श्रीमंत पुरूषांशी लैंगिक संबंध ठेवायला लावायचा...

SCROLL FOR NEXT