chain snatching esakal
नाशिक

Nashik Crime News : सिडकोत मोपेडवरून आलेल्या संशयितांनी दोघींचे मंगळसूत्र खेचले

Crime News : रविवारी (ता. २३) रात्री साडेनऊच्या सुमारास या घटना घडल्या असून, संशयित स्कुटीस्वारांचा पोलीस शोध घेत आहेत

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : सिडकोतील पाटीलनगर येथे ६५ वर्षीय वृद्धेची तर, दत्त चौकात विवाहितेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले. रविवारी (ता. २३) रात्री साडेनऊच्या सुमारास या घटना घडल्या असून, संशयित स्कुटीस्वारांचा पोलीस शोध घेत आहेत. (Nashik Crime Suspects from cidco chain snatching)

अलका कांतीलाल दुसे (६५, रा. दिव्या अॅडलॅबसमोर, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, त्या पतीसमोर पाटीलनगरकडे रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी समोरून स्कुटी मोपेडवरून दोघे संशयितांनी त्यांची स्कुटी दुसे दाम्पत्याच्या मध्ये थांबविली आणि काही कळायच्या त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पोबारा केला.

त्या अंबड पोलिसात तक्रार करण्यासाठी गेल्या असता, त्याठिकाणी स्वाती अमोल गव्हाणे यांचीही सोन्याचे मंगळसूत्र त्याच संशयितांनी दत्तचौकातून खेचून नेल्याचा प्रकार घडल्याचे समजले. संशयितांनी या दोन्ही गुन्ह्यात १ लाख १७ हजारांचे सोन्याचे दोन मंगळसूत्र खेचून नेले आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC: मुंबई महापालिकेतील ८०० अभियंत्यांच्या बदल्या, नवे आदेश जारी होणार; वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्यांची उचलबांगडी

Solapur News: पगारात ६०० रुपये जास्त गेल्याने मारहाण अन् अपमान; कामगार तरुणाने जीवन संपवले, दोन वर्षांपूर्वी विवाह, महिन्याभराचा मुलगा

Cracks Appear Before Road Completion: पूर्ण होण्याआधीच महामार्गाला भेगा; गुणवत्तेची तपासणी करण्याची नागरिकांची मागणी

Kolhapur Ganeshotsav : देखाव्यांचा थाट, रस्त्यांवर गर्दीची लाट शहरात बहुतांश देखावे सुरू; राजारामपुरी, शाहूपुरी, शिवाजी पेठेत गर्दी उसळली

Ajit Agarkar याला भारताच्या T20I कर्णधारपदी ऋतुराज गायकवाडला बसवायचे होते, पण...! इथूनच सुरू झाला BCCI सोबत राडा?

SCROLL FOR NEXT