Gavathi katta seized with Tadipar gangster. A team from Unit Two of the City Crime Branch along with esakal
नाशिक

Nashik Crime News : गावठी कट्ट्यासह तडीपार गुंडाला अटक

Crime News : शहर-जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुंडाला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह अटक करण्यात आली आहे

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहर-जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुंडाला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह अटक करण्यात आली आहे. वेदांत संजय चाळगे (१९, रा. राहुलनगर, तिडके कॉलनी, वेद मंदिरामागे, नाशिक) असे तडीपार गुंडाचे नाव आहे. (Nashik Crime Tadipar gangster arrested with Gavathi katta)

शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे अंमलदार महेश खांडबहाले यांना तडीपार गुंड शहरात विनापरवानगी वावरत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार पथकाने चांडक सर्कलकडून जलतरण तलावाकडे जाणार्या रस्त्यावरील विजय शासकीय इमारतीसमोर ताब्यात घेतले.

त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस असा २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन जाधव, राजेंद्र घुमरे, मनोहर शिंदे, विशाल कुवर, समाधान वाजे, महेश खांडबहाले, सामेनाथ जाधव यांच्या पथकाने बजावली.  (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : दोन दिवस जेवलो नाही, खूप शोधलं पण... ताम्हिणी घाटातील अपघाताचे दृश्य पाहून मृत तरुणांचे मित्र ढसाढसा रडले

Mangalwedha News : कात्राळचे शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT