crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : शहरातील मंदिरेही आता सुरक्षित नाही! सिडकोतील मंदिराची दानपेटीच चोरट्यांनी फोडली

Crime News : बंद घरांची लॉक तोडून चोरटे घरफोडी करीत असताना आता मंदिरातील दानपेट्याही चोरटे फोडत आहेत. यामुळे शहरात पोलिसांच्या रात्रीची गस्ती आहे की नाही, असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : नेहमी भाविकांची गर्दी असलेल्या रामतीर्थावरील श्री कपालेश्वर महादेव मंदिराच्या गाभार्यातील चांदीच्या पादुकांचा चांदीचा पत्राच चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ताजी असताना, सिडकोतील महालक्ष्मी मंदिरातील दोन दानपेट्या फोडून चोरट्यांनी २५ हजारांची रोकड चोरून नेली आहे.

बंद घरांची लॉक तोडून चोरटे घरफोडी करीत असताना आता मंदिरातील दानपेट्याही चोरटे फोडत आहेत. यामुळे शहरात पोलिसांच्या रात्रीची गस्ती आहे की नाही, असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे. (Thieves broke donation box of temple in CIDCO marathi news)

दिलीप वेडू वाघ (रा. ग्रीन पार्क रो हाऊस, जयहिंद कॉलनी, महाजन नगर, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, जयहिंद कॉलनीमध्ये महालक्ष्मी मंदिर असून, या मंदिरात दोन दानपेट्या आहे. शुक्रवारी (ता. २६) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या मंदिरात प्रवेश केला आणि येथील दोन्ही दानपेट्या फोडून त्यातील २५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली आहे. सदरची बाब शनिवारी (ता. २७) उघडकीस आली. याबाबत अंबड पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार देशमुख हे तपास करीत आहेत.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच शहरातील प्रसिद्ध श्री कपालेश्वर महादेव मंदिराच्या गाभार्यात असलेल्या पादुकांभोवती असलेला चांदीचा पत्रा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. तर, शहरात गेल्या काही दिवसांमध्ये चोर-घरफोड्याच्या घटना वाढल्या आहेत. रात्रीच्यावेळी चोरट्यांचा वावर वाढला असून, म्हसरुळ परिसरात तर चोरटे अपार्टमेंटच्या सीसीटीव्हीमध्येही कैद झाले आहेत. चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. (latest marathi news)

पोलीस गस्ती नावाला

शहर पोलिसांकडून रात्रीची गस्ती असते. तसेच, पोलीस ठाणेनिहाय बिटमार्शल्सचीही रात्रीची गस्ती असते. असे असताना शहरात रात्रीच्या चोऱ्या- घरफोड्या वाढल्या आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी पोलीस गस्तीवर असतात की नाही, की पोलीस गस्ती फक्त नावालाच, असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Play Store चा नवा लूक; Games आणि Appsचे डिझाइन बदलले

Mirya Nagpur Highway : 4 किमी लांब बोगदा अन् 100 कोटींचा उड्डाणपूल! नितीन गडकरींचा कोकणासाठी मास्टरप्लॅन, मिऱ्या-नागपूर महामार्गाचा प्रवास होणार सुसाट!

Latest Marathi News Live Update : बुलंदशहरमधील मुंडाखेडा येथे पावसामुळे एका मशिदीची संरक्षक भिंत कोसळली, तिघांचा मृत्यू

Lonavala Crime: लोणावळ्यात धक्कादायक प्रकार! दरडीच्या भीतीने गाव रिकामे, चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत २० घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास

Nanded Politics: हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय! नांदेड मनपेत मोठा राजकीय धक्का; एमआयएमच्या विरोधी पक्षनेतेपदाला उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT